JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Andheri East Bypoll : भाजप किती मतांने पराभूत होणार होती, संजय राऊतांनी कोर्टातून सांगितलं आकडा, राज ठाकरेंवरही टीका

Andheri East Bypoll : भाजप किती मतांने पराभूत होणार होती, संजय राऊतांनी कोर्टातून सांगितलं आकडा, राज ठाकरेंवरही टीका

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेले हे पत्र एका स्क्रिप्टचा भाग होता

जाहिरात

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेले हे पत्र एका स्क्रिप्टचा भाग होता

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 ऑक्टोबर :  अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये माघार घेण्याची भाजपवर मोठी नामुष्की आली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोर्टातून भाजपच्या पराभवाचं कारण समोर आणलं आहे. भाजप 40 हजार मतांने हरणार होती, त्यामुळे माघार घेतली, असा खुलासा राऊत यांनी केला. पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाच्या आवरात संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अंधेरी पोट निवडणुकीचा निकाल आमच्याच बाजूने  लागणार याची खात्री होती. थोड्या थोडक्या नाही ४४ हजारांच्या मताने ती जागा शिवसेना विजयी होणार होती. यामुळेच भाजपने उमेदवार मागे घेतला. पराभवाची चाहुल लागल्यामुळे भाजपने उमेदवार अर्ज मागे घेतला. भाजपने या मतदारसंघात वैयक्तिक सर्वे केला होता. त्यामध्ये त्यांना ऋतुजा लटके विजय होणाऱ्या संदर्भात माहिती मिळाली होती, असा खुलासा संजय राऊत यांनी केला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहिले होते.अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेले हे पत्र एका स्क्रिप्टचा भाग होता, अशी टीकाही राऊत यांनी केली. दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली. ईडीचे वकील अटर्नी जनरल अनिल सिंग यांचा युक्तिवाद झाला पूर्ण आहे. आजची सुनावणी आटोपली असून उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता संजय राऊत यांचे वकील  युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे राऊत यांना जामीन मिळतो का हे पाहण्याचे ठरणार आहे. (Andheri East Bypoll : शिवसेनेच्या वाघिणीने भाजपला दाखवले आस्मान, ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया….) दरम्यान,  भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना माघार घेण्यास सांगितल्यानंतर अंधेरीमध्ये भाजपच्या गोटात शांतता पसरली. यावेळी पटेल यांच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे देखील पाहायला मिळत आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल मी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे, तो पाळणार आहे, असं पटेल यांनी सांगितलं.

दरम्यान,  भाजपच्या या निर्णयाबाबत बोलताना भाजपचे नेते मुरजी पटेल म्हणाले, की मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. मी अजिबातही नाराज नाही. मी पक्षाचा आदेश मान्य करतो. पक्षाने याबाबतचा निर्णय सांगताच एकाही मिनिटाचा विचार न करता अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती मुरजी पटेल यांनी दिली. (Andheri East Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात सर्वात मोठी बातमी; भाजपची माघार) या निर्णयामुळे तुम्ही नाराज आहात का, असा सवाल केला असता पटेल म्हणाले, की यापुढेही मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत राहील. पक्षाचा आदेश माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी पक्ष जो आदेश देईल तो मानणारा कार्यकर्ता आहे. मात्र, या निवडणुकीचे सर्व्हे बघून घ्या. आम्ही मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार होतो, असा दावा त्यांनी केला आहे. पण पक्ष महत्त्वाचा आहे त्यामुळे मी नाराज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अंधेरी पूर्वच्या या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत बरेच ट्विस्ट आले. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई महापालिकेत कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला, पण त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. अखेर हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महापालिकेला ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. अशात आता मुरजी पटेल यांनीही माघार घेतली आहे. त्यामुळे आता लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या