JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'उद्धव ठाकरे रमेश लटकेंना घरात प्रवेशही देत नव्हते, त्यांना सतत..', नितेश राणेंचे गंभीर आरोप

'उद्धव ठाकरे रमेश लटकेंना घरात प्रवेशही देत नव्हते, त्यांना सतत..', नितेश राणेंचे गंभीर आरोप

नितेश राणे म्हणाले, की रमेश लटके यांनी मला स्वतः सांगितलं होतं की त्यांना मातोश्रीवर प्रवेश दिला जात नाही. उद्धव ठाकरे त्यांना वारंवार अपमानित करत असत

जाहिरात

फाईल फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 14 ऑक्टोबर : सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. BMC ने ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचा राजीनामा अर्ज नामंजूर केल्याने बराच गोंधळ उडाला होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर हा अर्ज स्विकारण्यात आला. यानंतर आता या प्रकरणावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला आणि फडणवीस भेटीवर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा, म्हणाले… नितेश राणे म्हणाले, की रमेश लटके यांनी मला स्वतः सांगितलं होतं की त्यांना मातोश्रीवर प्रवेश दिला जात नाही. उद्धव ठाकरे त्यांना वारंवार अपमानित करत असत. उद्धव ठाकरे हे त्यांचा फोनही घेत नव्हते. माणूस जिवंत असताना त्याला किंमत दिली नाही. मृत्यूनंतर घाणेरड्या राजकारणासाठी वापर करून घेतला जात आहे, असा आरोप राणेंनी केला. यासोबतच ऋतुजा लटकेंसोबतही असंच होणार असंही ते म्हणाले. राणे म्हणाले, की मातोश्रीत कोणाला किती इज्जत मिळते, हे सगळ्यांना माहिती आहे. पुढे ते म्हणाले, की उद्धव ठाकरे वारंवार अपमानित करतात. भेट देत नाहीत, अशी तक्रार रमेश लटके करायचे. मात्र, त्यांच्या निधनानंतर उगाचच सहानुभूती लाटण्याचं काम उद्धव ठाकरे यांची टोळी करत आहे, असा आरोप नितेश राणे यांनी यावेळी बोलताना केला आहे. आज लटके जिवंत असते तर ते एकनाथ शिंदेंसोबत गेले असते, असा दावाही त्यांनी केला. ‘ज्यावेळी भाजप आमचा वापर करतंय असं वाटेल, तेव्हा आम्ही..’; उदय सामंत यांचा थेट इशारा यासोबतच ठाकरे गटाच्या नव्या मशाल या निवडणूक चिन्हावरुनही त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं नवीन चिन्ह म्हणजे आईस्क्रीमचा कोन असल्यासारखं मला वाटतं, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या मशालीमध्ये आगच नाही, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या