JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बंडातात्या कराडकरांचा बोलविता धनी भाजप? अमृता फडणवीस म्हणाल्या...

बंडातात्या कराडकरांचा बोलविता धनी भाजप? अमृता फडणवीस म्हणाल्या...

Amruta Fadnavis reaction on Bandatatya karadkar controversial statement: बाडातात्या कराडकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 फेब्रुवारी: कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर सातारा पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना चौकशीसाठी ताब्यात (Satara police detain Bandatatya Karadkar) घेतलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या, स्त्रियांवर टिपण्णी करणं आणि खासकरुन त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. आपल्या देशात हेच होतं. कुणी काही बोलतं आणि मग आंदोलनं होतात. ही मानसिगतेची बाब आहे. आपल्.याला विचार करायला हवा की काय बोलावं आणि काय बोलू नये. वाचा :  बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात भाजप बोलवता धनी? भाजप आणि आरएसएस पुरोगामी आहे. स्त्रियांचा मान, सन्मान ठेवणं हे प्रथम कर्तव्य आहे आणि ते पार पाडतात. मी आरएसएस आणि भाजपच्या खूप जवळची आहे. मी राजकीय व्यक्ती नाहीये, मी तु्हाला एका शब्दात कसांगू शकते की स्त्रियांचा सर्वाधिक कुणी आदर करत असेल तर आरएसएस करतं असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, जेव्हा मी काही बोलते तेव्हा तुम्ही हे विसरुन जा की देवेंद्र फडणवीस यांची बायको म्हणून बोलते. मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते. मला दिसतं की, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते, त्रास होतो. आज मुंबईत ट्रॅफिक जाम मुळे तीन टक्के घटस्फोट होतात हे तुम्हाल माहिती आहे का? बंडातात्या कराडकर यांनी मागितली माफी बंडातात्या कराडकर म्हणाले, “समजा ज्यांनी माझ्याविरोधात आक्षेप घेतला आहे त्यांचयासोबत फोनवर बोललो आहे मी. जे वक्तव्य केलं त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागायला तयार आहे. माफी मागायला कमीपणा कसला. तुम्ही कशासाठी विषय वाढवता.” सर्व महाराष्ट्राल माहिती आहे. फक्त आम्ही म्हणालो म्हणजे काय झालं. तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला सर्व माहिती आहे असंही बंडातात्या कराडकर म्हणाले. राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असुन त्याबाबत सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल 48 तासाच्या आत अहवाल आयोगास सादर करावा. तसेच बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा अशा सूचना पोलिसांना दिल्या असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या