JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'शिवसेना खासदारांच्या नाराजीला विनायक राऊतच जबाबदार'; राहुल शेवाळेंनी सांगितलं कारण

'शिवसेना खासदारांच्या नाराजीला विनायक राऊतच जबाबदार'; राहुल शेवाळेंनी सांगितलं कारण

राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्याच्या निर्णयानंतर विनायक राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केलं. याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार आज लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 22 जुलै : लोकसभेमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदामध्ये झालेल्या बदलामुळे शिवसेनेच्या खासदारांमधील खदखदही बाहेर आली आहे. पक्षाच्या बारा खासदारांनी केलेल्या मागणीच्या आधारे राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्याच्या निर्णयानंतर विनायक राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केलं. याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार आज लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. शिंदे सरकारचा आणखी एक धक्का; 600 कोटीच्या कामांना स्थगिती गटनेत पदी राहुल शेवाळे यांची नेमणूक करताना उद्धव ठाकरे यांच्या गटाची बाजू विचारात घेतली नाही, याबाबत ते अधिकृत पत्र देणार आहेत. तसंच शिंदे गटाने 19 जुलैला गटनेता बदलण्याची मागणी केला असताना १८ जुलैलाच राहुल शेवाळे यांचे नाव लोकसभा सचिवालयाने अपडेट कसे केले? यावरही ते पत्र देण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना राहुल शेवाळे म्हणाले की आम्ही कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत. विनायक राऊत हे खासदारांना न्याय मिळवून देण्यात अयशस्वी ठरले. त्यांनी कधीच इतर खासदारांना बोलण्याची संधी दिली नाही. गेल्या अडीच वर्षांचा राग खासदारांनी या माध्यमातून व्यक्त केला आहे, असं ते म्हणाले. Kolhapur Sharad Pawar : कोल्हापूरच्या बंडखोर खासदारांना पाडण्यासाठी शरद पवारांचा गेम प्लॅन, मुश्रीफांना कामाला लागण्याचे आदेश ते पुढे म्हणाले की, विनायक राऊत यांचा दावा चुकीचा आहे, लोकसभा अध्यक्षांनी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत आणि गटनेता म्हणून माझी निवड केली आहे. उपराष्ट्रपती निवडणूकीबाबत संजय राऊत यांची भूमिका व्यक्तिगत असेल, आम्ही NDA उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या