JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदे सरकारचा आणखी एक धक्का; 600 कोटीच्या कामांना स्थगिती

शिंदे सरकारचा आणखी एक धक्का; 600 कोटीच्या कामांना स्थगिती

शिंदेंनी अनेक ठिकाणी आधीच्या सरकारने मंजूर केलेले निधी रोखले आहेत. यापाठोपाठ आता शिंदे सरकारकडून सामाजिक न्याय विभागाच्या 600 कोटींच्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 22 जुलै : एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने नवीन सरकार स्थापन केलं आहे. मात्र, सरकार स्थापनेनंतर शिंदे सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारला अनेक धक्के दिले आहेत. शिंदेंनी अनेक ठिकाणी आधीच्या सरकारने मंजूर केलेले निधी रोखले आहेत. यापाठोपाठ आता शिंदे सरकारकडून सामाजिक न्याय विभागाच्या 600 कोटींच्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Kolhapur Sharad Pawar : कोल्हापूरच्या बंडखोर खासदारांना पाडण्यासाठी शरद पवारांचा गेम प्लॅन, मुश्रीफांना कामाला लागण्याचे आदेश 2022-23 अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना स्थगिती देऊन फेरआढावा घेण्याचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने हे परिपत्रक जारी केलं आहे. जिल्हा नियोजन समिती अध्यक्षांच्या नव्याने नियुक्त्या झाल्यावर प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची यादी ते पालकमंत्र्यांपुढे सादर करतील, त्यानंतर या योजनांना पालकमंत्री मंजुरी देतील, अशी भूमिका शिंदे सरकारने घेतली आहे. ‘OBC आरक्षण आमच्यामुळेच’; भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई, शिवसेनेनं केले हे दावे सामाजिक न्याय विभागाच्या योजना - सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत (अनुसुचित जाती उपाययोजना) अंगणवाड्या, गटई स्टॉल योजना, अपंग व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी वित्तिय सहाय्य, अनुसुचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य, गटई कामगारांना लोखंडी स्टॉल तसंच शिक्षणसाठी कर्ज योजना, प्रशिक्षण योजना, शैक्षणिक कर्ज योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क, वाहन चालक प्रशिक्षण योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन या योजना राबवण्यात येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या