JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंच्या युवासेनेत सर्जिकल स्ट्राईक, विदर्भात 150 युवासैनिक फोडले

श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंच्या युवासेनेत सर्जिकल स्ट्राईक, विदर्भात 150 युवासैनिक फोडले

आदित्य ठाकरेंच्या युवासेनेत विदर्भात मोठी फूट पडली आहे. पूर्व विदर्भाच्या युवा सेनेच्या दीडशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे.

जाहिरात

आदित्य ठाकरेंच्या युवासेनेत विदर्भात मोठी फूट पडली आहे. पूर्व विदर्भाच्या युवा सेनेच्या दीडशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 नोव्हेंबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे एकीकडे महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. तर दुसरीकडे, बाळासाहेबांची शिवसेना गटाने विदर्भामध्ये युवासेनेला खिंडार पाडण्याची तयारी केली आहे. पूर्व विदर्भाच्या युवा सेनेच्या दीडशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून शिंदे गटात प्रवेश करणार आहे. आदित्य ठाकरेंच्या युवासेनेत विदर्भात मोठी फूट पडली आहे. पूर्व विदर्भाच्या युवा सेनेच्या दीडशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. किरण पांडव आणि श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करणार आहे. श्रीकांत शिंदे यांनी युवासेनाप्रमुख पद घ्यावं, अशी मागणीच पूर्व विदर्भातल्या युवा सैनिकांनी केली आहे. (‘हर हर महादेव’ वादात मनसे कार्यकर्त्याला NCP कडून खळ्ळ-खट्याक, राज ठाकरे संतापले) पूर्व विदर्भातल्या सर्व महात्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर प्रवेश करणार आहे. (जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात, ‘हर हर महादेव’ पाहायला आलेल्या प्रेक्षकाला NCP कार्यकर्त्यांकडून मारहाण) पूर्व विदर्भाच्या या युवासैनिकांनी दिले राजीनामे 1) हर्षल शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर 2) शुभम नवले युवासेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण 3) रोशन कळंबे युवासेना जिल्हाप्रमुख भंडारा 4) दीपक भारसाखरे गडचिरोली युवासेना जिल्हाप्रमुख 5) कगेश राव गोंदिया युवासेना जिल्हाप्रमुख 6) ऋषिकेश मिश्रा युवासेना जिल्हाप्रमुख गोंदिया 7) नेहा भोकरे युवतीसेना जिल्हाप्रमुख नागपूर 8) सोनाली वैद्य युवतीसेना जिल्हाप्रमुख नागपूर ग्रामीण 9) प्रफुल सरवान जिल्हा समन्वयक नगरसेवक भद्रावती चंद्रपूर जिल्हा 10) राज तांडेकर जिल्हा समन्वयक नागपूर 11) लखन यादव जिल्हा समन्वयक रामटेक 12) कानाजी जोगराणा जिल्हा चिटणीस नागपूर 13) अभिषेक गिरी उप-जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण 14) सुनील यादव रामटेक विधानसभा समन्व्यक दरम्यान,  आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मी देवेंद्र फडणवीस यांच्या जागेवर असतो तर राजीनामा देऊन निवडणुकांना सामोर गेलो असतो. त्यामुळे हिंमत असेल तर निवडणुकांना समोर जाणार का? असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या