JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सचिन तेंडुलकरने केली सफाईदार 'बॅटिंग' !

सचिन तेंडुलकरने केली सफाईदार 'बॅटिंग' !

05 ऑक्टोबर : भारतरत्न सचिन तेंडुलकर भल्या पहाटे रस्त्यावर साफसफाई करत होता..! हे ऐकून कुणीही दचकेल. पण दचकू नका सचिनने खरंच रस्त्यावर साफसफाई केलीये. त्याचं झालं असं की, महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाला सुरूवात केली. खुद्द पंतप्रधानांनी स्वत: हातात झाडू घेऊन साफसफाई केली आणि स्वच्छ भारताचा नारा दिला. त्यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकरसह बॉलिवडूच्या सेलिब्रिटींना या अभियानात सहभागी होण्याचे ‘क्लीन इंडिया चॅलेंज’ दिले. हे आव्हान आईस बॅकेट चॅलेंजच्या धर्तीवर होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

05 ऑक्टोबर : भारतरत्न सचिन तेंडुलकर भल्या पहाटे रस्त्यावर साफसफाई करत होता..! हे ऐकून कुणीही दचकेल. पण दचकू नका सचिनने खरंच रस्त्यावर साफसफाई केलीये. त्याचं झालं असं की, महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाला सुरूवात केली. खुद्द पंतप्रधानांनी स्वत: हातात झाडू घेऊन साफसफाई केली आणि स्वच्छ भारताचा नारा दिला. त्यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकरसह बॉलिवडूच्या सेलिब्रिटींना या अभियानात सहभागी होण्याचे ‘क्लीन इंडिया चॅलेंज’ दिले. हे आव्हान आईस बॅकेट चॅलेंजच्या धर्तीवर होते. फरक एवढाच होता की, आईस बॅकेट चॅलेंजमध्ये तीन जणांना हे चॅलेंज द्यायचं होतं तर इथं नऊ जणांना चलेंज द्यायचं होतं. मोदींनी दिलेल्या नऊ जणांपैकी सचिन तेंडुलकरचा त्यात सहभाग होता. मग काय मास्टर ब्लास्टर सचिनने मनावर घेतलं आणि चॅलेंज स्वीकारलं. नुसतं चलेंज स्वीकारलं नाहीतर स्वत: रस्त्यावर उतरून साफसफाई केलीये. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलच्या बाजूला वांद्रे रिक्लेमेशन बस डेपोमध्ये सचिनने साफसफाई करण्यासाठी पुढाकार घेतला. शनिवारी सचिनने पहाटे साडे चार ते साडे सहा आणि आज साडे पाच ते साडे सहा या वेळेत त्याने साफसफाई केली. आता सचिनने पुढाकार घेतलाय त्यानंतर कोण हे चॅलेंज स्वीकारणार हे पाहण्याचं ठरेल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या