JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai Crime News : भीक मागण्यासाठी मुले पळवून नेणारी टोळी सक्रीय, मुंबईत मोठं रॅकेट

Mumbai Crime News : भीक मागण्यासाठी मुले पळवून नेणारी टोळी सक्रीय, मुंबईत मोठं रॅकेट

कांजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांजुर रेल्वे स्थानक फुटपाथवर राहणाऱ्या वर्षा कांबळे हिचा पाच वर्षाचा मुलगा आणि एक वर्षाची मुलगी या दोघांचं अपहरण करण्यात आलं होतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 डिसेंबर : भीक मागण्यासाठी मुलांचं अपहरण करणाऱ्या एका टोळक्याला कांजूर पोलिसांनी गजाआड केला आहे. कांजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांजुर रेल्वे स्थानक फुटपाथवर राहणाऱ्या वर्षा कांबळे हिचा पाच वर्षाचा मुलगा आणि एक वर्षाची मुलगी या दोघांचं अपहरण करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी पुण्याहून मुंबईकडे येताना ट्रेनमध्ये वर्षाची काळे कुटुंबीयांशी ओळख झाली होती आणि त्यांनीच आपल्या मुलांचं अपहरण केलं असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं होतं.

हे ही वाचा :  कानडी सरकारच्या ड्रायव्हरचा खोटेपणा उघड, गाडीवर दगडफेकीबद्दल नवा खुलासा

त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर काळे कुटुंबीयांचा ठाणे, कोल्हापूर, सांगली, नगर, औरंगाबाद या शहरात शोध घेऊन पाठलाग केला. यांच्यातील मुख्य आरोपी हर्षद काळे याच्यासोबत ताराबाई काळे, चंदू काळे या दोघांना ताब्यात घेतलं. हर्षद याची बायको पौर्णिमा काळे ही सध्या फरार आहे.

संबंधित बातम्या

वर्षा यांच्या दोन मुलांची सुरक्षित सुटका यांच्याकडून करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत या दोन मुलांचं अपहरण भीक मागण्यासाठी केलं असल्याचं प्राथमिक दृष्ट्या समोर आलं आहे. परंतु त्यानंतर पुढे या मुलांचं हे आरोपी काय करायचे आणि आतापर्यंत अशी किती मुले त्यांनी अपहरण केली आहेत.  

हे ही वाचा :  भाजप नेत्याच्या वाढदिवसाला कार्यकर्ते झाले बेभान, पोलिसांनी केला लाठीचार्ज तर स्टेशनवरच काढला मोर्चा

जाहिरात

याचा तपास सध्या कांजूर पोलीस करत आहेत. या दोन मुलांची सुटका करण्यासाठी तब्बल 11 दिवस पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला आणि अखेर त्यांची सुटका करून दोन्ही मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं.

कांजूर मार्ग पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलिस अधिकारी पुरषोत्तम कराड यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितलं की, कांजूर मार्ग रेल्वे स्थानकाच्या बाहेरुन या दोन मुलांचं अपहरण करण्यात आलं. आरोपींनी तीन ते चार दिवस या मुलांवर नजर ठेवली होती आणि त्यानंतर अपहरण केलं. यानंतर पोलिसांनी याच्या तपासासाठी पाच टीम तयार केल्या.

जाहिरात

त्यानंतर ठाणे, पुणे, सोलापूर, सांगली, औरंगाबाद आणि इतर ठिकाणी या टीम पाठवल्या. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक महिला आरोपी फरार आहे. केवळ भीक मागण्यासाठी या मुलांचं अपहरण करण्यात आलं होतं की अजून काही उद्देश या मागे होता याबद्दल तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या