JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Corona : मुंबईला चहुबाजूंनी कोरोनाने घेरलं, ठाणे मंडळात दिवसभरात तब्बल 30 हजार 312 नवे कोरोनाबाधित

Maharashtra Corona : मुंबईला चहुबाजूंनी कोरोनाने घेरलं, ठाणे मंडळात दिवसभरात तब्बल 30 हजार 312 नवे कोरोनाबाधित

मुंबई आणि ठाण्यातील आजच्या नव्या कोरोनाबाधितांची आकडेवारी प्रचंड चिंता वाढवणारी आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धपत्रकात ठाणे मंडळात आज दिवसभरात एकूण 30 हजार 312 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जानेवारी : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने (Corona Third Wave) थैमान घालायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन लाटांमध्ये जितके रुग्ण एका दिवसात बाधित होत नव्हते त्यापेक्षा अनेकपटीने नवे रुग्ण (New Corona Patients) दरदिवसा बाधित होत असल्याचं दृश्य आहे. मुंबईत (Mumbai) गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. विशेष म्हणजे काल मुंबईतील कोरोनाबाधितांनी कोरोनाच्या पहिल्या-दुसऱ्या लाटेचा रेकॉर्ड मोडला होता. मुंबईत काल दिवसभरात 15 हजारांपेक्षाही नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज हाच आकडा (Thane Corona Cases) थेट 20 हजारांच्या पार गेला आहे. कोरोना संकटाची हीच परिस्थिती ठाण्यातही गडद होताना दिसत आहे. ठाण्यात कोरोनाबाधितांच्या नव्या आकडेवारीने याआधीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ठाण्यात दिवसभरात तब्बल 2500 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील कोरोना संकट खूप वेगाने आणि जास्त गडद होताना दिसतंय. कोरोनाने मुंबईला चहुबाजूंनी घेरलं मुंबई आणि ठाण्यातील आजच्या नव्या कोरोनाबाधितांची आकडेवारी प्रचंड चिंता वाढवणारी आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धपत्रकात ठाणे मंडळात आज दिवसभरात एकूण 30 हजार 312 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेतही मुंबई सर्वाधिक बाधित होत असल्याचं दृश्य आहे. तसेच मुंबईच्या चारही बाजूला असणाऱ्या महापालिका आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने हातपाय पसरताना दिसतोय. ठाणे मंडळामध्ये मुंबई मनपा, ठाणे मनपा, कल्याण-डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा, मीरा भाईंदर मनपा, भिवंडी निजामपूर मनपा, वसईविरार मनपा, पनवेल मनपा, नवी मुंबई मनपा यांच्यासह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश होतो. ठाणे मंडळाची आजची आकडेवारी बघता राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला चारही बाजूने कोरोना संकटांनी वेढलेले बघायला मिळत आहे. हेही वाचा :  मुंबईत कोरोनाचा उद्रेक, बाधितांच्या संख्येने सर्व रेकॉर्ड मोडले, आकडा थेट 20 हजार पार मुंबईतील कोरोना पॉझिटिव्हीटी दर वाढला मुंबईतील कोरोना पॉझिटिव्हीटी दर हा 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे लक्षणे नसलेल्या बाधितांची संख्या कालपर्यंत 87 टक्के होती, पण हीच आकडेवारी आज थेट 85 टक्क्यांच्या खाली गेली आहे. तसेच मुंबईतील एकूण बेड्सच्या आकडेवारीपैकी 16.8 बेड्स हे आज भरले आहेत. येत्या काळात रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर प्रशानापुढील आव्हानं आणखी वाढत जातील. ठाणे मंडळातील इतर मनपा हद्दीतील आजची आकडेवारी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धपत्रकानुसार ठाणे आणि ठाणे मनपा हद्दीत आज दिवसभरात 3 हजार 203 नवे रुग्ण आढळले आहेत. तर नवी मुंबई मनपा हद्दीत 2 हजार 297 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली मनपा हद्दीत 1308 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे मीरा भाईंदर मनपा हद्दीतील रुग्णसंख्याही प्रचंड वाढली आहे. मीरा भाईंदरमध्ये 1 हजार 31 नवे रुग्ण आढळले आहेत. तर वसई विरारमध्ये 901 आणि पनवेल मनपा हद्दीत 939 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या