प्रवीण तांडेकर (प्रतिनिधी), भंडारा, 28 जून: जुळ्या मुली जन्माला आल्यामुळे दोन्हीचा सांभाळ करायचा तरी कसा, या विवंचनेत निर्दयी आईनंच त्यापैकी एकीला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हेही वाचा.. चिंतेत आणखी भर! नाशकात हॉस्पिटल फुल्ल, 10 दिवसांत आढळले 1200 कोरोनाबाधित रुग्ण भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात ही मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. पवनी येथी अलफिया रामटेके या महिलेनं दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. आर्थिक परिस्थिती हालाखीची. त्यात दोन-दोन मुली सांभाळायच्या कशा? अशा प्रश्न महिलेला सतावत होता. अखेर महिलेनं मुलींच्या जन्माच्या 25 व्या दिवशी एका मुलीला अंगणातील पाण्यानं भरलेल्या टाकीत बुडवून ठार मारले. नंतर मुलीला कुणीतरी उचलून नेलं, असा बनाव केला. मात्र, पोलिस तपासात आईनं आपल्या पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचं समोर आले. नंतर पोलिसांनी 22 जूनला निर्दयी आईला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. असा केला बनाव… एक मुलगी खाटेवर आहे. मात्र दुसरी मुलगी कुठेही दिसत नाही. असा बनाव आरोपी आईनं केला होता. नातेवाईकांनी सगळीकडे शोध घेतला. तान्हुली कुठेच न दिसल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी केली असता अंगणात असलेल्या पाण्याच्या टाकीत तान्हुलीचा मृतदेह तरंगत असल्याचं दिसून आलं. या प्रकारामुळे खळबळ उडाली. हेही वाचा.. लॉकडाऊनमध्ये काम नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर; नैराश्यात तरुणाने स्वत:ला संपवलं पोलिसांनी घराच्या लोकांची कसून चौकशी केली असता आईनेच आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. पवनी पोलिसांनी 25 वर्षीय अलफिया रामटेके हिला अटक केली आहे.