JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अन् फोटोतील तिघांनी सोडलं जग, एकटीच महिला उरली; साताऱ्यातील खळबळजनक घटना

अन् फोटोतील तिघांनी सोडलं जग, एकटीच महिला उरली; साताऱ्यातील खळबळजनक घटना

Murder in Satara: सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका महिलेनं आपल्या दोन पोटच्या लेकरांची गळा आवळून हत्या (Mother Killed 2 son by strangulation) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात

कराड शहरात हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. (फोटो-टीव्ही9)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 26 ऑगस्ट:  सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका महिलेनं आपल्या दोन पोटच्या लेकरांची गळा आवळून हत्या (Mother Killed 2 son by strangulation) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यानंतर महिलेनं स्वतः ही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Accused mother attempt to commits suicide) केला आहे. पण सुदैवानं संबंधित महिला बचावली असून तिची प्रकृती गंभीर आहे. कराडातील एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना कराड शहरातील आहे. येथील एका 35 वर्षीय महिलेनं आपल्या पोटच्या लेकरांची गळा आवळून हत्या केली आहे. तिनं सर्वप्रथम आपल्या 6 आणि 9 वर्षाच्या मुलांची हत्या करून स्वत: ही विष प्राशन केलं होतं. पण संबंधित महिला बचावली असून तिच्यावर कराडातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोटच्या मुलांच्या दुहेरी हत्याकांडानं परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू आहे. हेही वाचा- सुखी संसार लागली नजर, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही मृतदेहाजवळच घेतला गळफास या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करत असताना पोलिसांना सुसाईड नोटही मिळाली आहे. संबंधित महिलेनं नैराश्यातून हे कृत्य केल्याचं म्हटलं आहे. या सुसाईड नोटमध्ये तिनं आत्महत्येचं आणि लेकरांची हत्या करण्यामागचं कारणही नमूद केलं आहे. हेही वाचा- नवऱ्यानंतर आईनंही घेतला जगाचा निरोप; हताश महिलेनं लेकीसह असा केला आयुष्याचा शेवट सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या आशयानुसार, संबंधित महिलेच्या पतीचं सहा महिन्यांपूर्वी एका अपघातात निधन झालं होतं. एकाकी पतीनं अशाप्रकारे जगाचा निरोप घेतल्यानं संबंधित महिला हताश झाली होती. मन खचल्यामुळे मागील काही काळापासून तिला नैराश्य आलं होतं. यातूनच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची हत्या करून स्वत: ही आत्महत्येचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा  पुढील तपास कराड पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या