JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Solapur Crime: दोन चिमुकल्यांना विष पाजून आईने केली आत्महत्या, सोलापुरातील घटनेने खळबळ

Solapur Crime: दोन चिमुकल्यांना विष पाजून आईने केली आत्महत्या, सोलापुरातील घटनेने खळबळ

Solapur crime: आपल्या पोटच्या दोन मुलांना आईनेच विष पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात

खळबळजनक! आधी दोन चिमुकल्यांना विष पाजलं आणि मग आईने.... ; सोलापुरातील धक्कादायक घटना

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर, 14 मे : जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलांना विष पाजल्याचा (mother feed poison to son and daughter) प्रकार समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील (Solapur district) मोहोळ तालुक्यात असलेल्या पेनूर (Penur of Mohol Taluka) येथे ही धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. प्रियांका चवरे असे महिलेचे नाव असून सात महिन्याच्या सुप्रियाचा यामध्ये  मृत्यू झाला आहे. नेमकं काय आहे प्रकरण? मोहोळ तालुक्यातील पेनूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादातून प्रियांका चवरे नावाच्या महिलेने आपल्या सात वर्षाच्या मुलीसह चार वर्षाच्या मुलाला विषारी औषध पाजले. यानंतर प्रियंका चवरे या महिलने स्वतः टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेत सात महिन्यांच्या सुप्रियाचा मृत्यू झाला आहे. तर चार वर्षांच्या मुलावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा :  सासू-सुनेमधील वादाने घेतलं भयंकर रूप; Video होतोय व्हायरल गेल्या काही दिवसांपासून चवरे कुटुंबामध्ये घरगुती वाद सुरू होते. याच वादामुळे प्रियांका चवरे या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सध्या या धक्कादायक घटनेचा पोलीस तपास करत आहेत. जळगावात मित्रांनीच केली मित्राची हत्या, इमारतीवरुन ढकलतानाचा CCTV जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन पडून मुकेश रमेश राजपूत या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती. पण आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुकेश याचा पडून नव्हे तिसऱ्या मजल्यावरून ढकलून खून केल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी शहर पोलिसांनी बुधवारी तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमर उर्फ लखन शांताराम बारोट, पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे आणि निखिल राजेश सोनवणे अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. दारु पिताना अमर आणि पराग या दोघांनी मुकेश सोबत वाद घातला. हमरीतुमरी झाल्यावर दोघांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला होता. मुकेश खाली पडल्यानंतर अमर आणि पराग हे दोघेही स्वतः पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी मुकेश हा तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याची माहिती पोलिसांना दिली होती. यानंतर पोलिसांनी गोलाणी मार्केट येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. त्यावेळी एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुकेशला दोन जण ढकलून देत असल्याचे कैद झाल्याचे समोर आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या