JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मला मंत्रिपद हवं आहे, म्हणून...'; गुवाहाटी दौऱ्याआधी आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया

'मला मंत्रिपद हवं आहे, म्हणून...'; गुवाहाटी दौऱ्याआधी आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया

आता मंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले, की मला मंत्रिपद हवं आहे. या मागणीसाठी मी देवीकडे साकडं घालणार आहे

जाहिरात

आमदार संतोष बांगर

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 नोव्हेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार आणि खासदार कुटुंबासह आज गुवाहाटीला जात आहेत. गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे सगळे याठिकाणी जात आहेत. यापूर्वी महाराष्ट्रातील सत्तांतराआधी हे सगळे गुवाहाटीला गेले होते. यानंतर आता राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह देवीच्या दर्शनासाठी जात आहे. आधी बंडखोर आणि आता मंत्री बनून कामाख्या देवीचं दर्शन; मुख्यमंत्र्यासह शिंदे गटाचे आमदार आज गुवाहाटीला जाणार मुंबई विमानतळावरून सकाळी साडेनऊ वाजता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे 178 सदस्य गुवाहाटीच्या दिशेने विशेष विमानाने उड्डाण करणार आहेत. यासाठी हे सर्व विमानतळावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान गुवाहाटीला निघण्याआधी शिंदे गटाचे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं अशी अनेक नेत्यांची इच्छा होती. यातीलच एक संतोष बांगर हेदेखील होते. आता मंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले, की मला मंत्रिपद हवं आहे. या मागणीसाठी मी देवीकडे साकडं घालणार आहे. माझी टगेगिरी नाही, तर ही माझी स्टाईल आहे, असंही ते यावेळी म्हणाले. वरळीच्या रणांगणात काका-पुतण्याचा सामना, आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी मनसेची फिल्डिंग! दरम्यान शिंदे गटाचे नेते गुवाहाटी विमानतळावर दुपारी 12 वाजता पोहोचतील. यानंतर पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार सत्तांतर नाट्यावेळी प्रसिद्ध झालेल्या रेडिसन ब्लू हॅाटेलवर मुक्काम करणार आहेत. संतोष बांगर यांचा कर्मचाऱ्याला दम - आमदार संतोष बांगर हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कालच त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी महावितरणच्या एका कर्मचाऱ्याला फोन करून मारहाणीची धमकी दिली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महावितरणचे कर्मचारी थकीत बिलामुळे लाईन तोडण्यासाठी तगादा लावत असल्याचे प्रकरण आमदार संतोष बांगर यांच्याकडे गेले होते. यावर आमदार बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आहे. इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन, असा इशारा बांगर यांनी दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या