JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नांदेडच्या राजकारणात खळबळ, MIM च्या उमेदवारानेच घेतली काँग्रेस नेत्याची भेट

नांदेडच्या राजकारणात खळबळ, MIM च्या उमेदवारानेच घेतली काँग्रेस नेत्याची भेट

काँग्रेस नेत्याच्या फार्म हाऊसवर एमआयएमचा नेता दाखल झाल्याने नांदेडच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुजीब शेख, नांदेड, 18 सप्टेंबर : नांदेड उत्तर मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार फेरोज लाला आणि नांदेड जिल्हा प्रभारी महोमद जाबेर हे काँग्रेस नेत्याच्या फार्म हाऊसवर दाखल झाल्याने नांदेडच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्याच्या फार्म हाऊसवर एमआयएमचे दोन्ही नेते तब्बल एक तास थांबले होते. एमआयएम आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये या फार्महाऊसवर बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. या नेत्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंच्या आधारे नांदेडमधील एमआयएम काँग्रेसला मॅनेज असल्याचा आरोपदेखील केला जात आहे.

नांदेड उत्तर मधून काँग्रेसचे आमदार डी पी सावंत हे उमेदवार आहेत. आमदार सावंत हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू आहेत. त्यांच्याविरोधात एमआयएमने फेरोज लाला यांना उमेदवारी दिली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फेरोज लाला काँग्रेस नेत्याच्याच फार्म हाऊसवर  गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे. बिलोलीचे माजी नगराध्यक्ष आणि अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक संतोष कुलकर्णी यांच्या फार्म हाऊसवर  एमआयएमच्या नेत्यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, नांदेडमध्ये एमआयएम हा पक्ष अशोक चव्हाण यांना मॅनेज असल्याचा आरोप अनेक वेळा झाला आहे. मात्र काँग्रेस नेत्यासोबत बैठक झाल्याचा आरोप एमआयएमच्या फेरोज लाला यांनी फेटाळला आहे. मी लघुशंकेसाठी त्या फार्महाऊसवर  गेलो होतो, असं अजब स्पष्टीकरण एमआयएमच्या उमेदवाराने दिलं आहे. ’ मार्गावरून मी आणि नांदेडचे प्रभारी महोमद जाबेर येत होतो. लघुशंकेसाठी त्या फार्महाऊसवर आम्ही गेलो होतो,’ असं फेरोज लाला यांनी म्हटलं आहे. धक्कादायक! शाळेनं प्रवेश नाकारला, का तर म्हणे पहिलीतला विद्यार्थी मारतोय डोळा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या