JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मदरस्याची जागा आयसोलेशन वार्डसाठी देणार, मौलाना हारिस दस्तगीर यांची घोषणा

मदरस्याची जागा आयसोलेशन वार्डसाठी देणार, मौलाना हारिस दस्तगीर यांची घोषणा

एकीकडे दिल्लीतील निजामुद्दीनच्या तबलिगी जमातचा मुद्दा गाजत असताना सोलापुरातील मुस्लिम बांधवांनी सकारात्मक पाऊल उचलल्याचे दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 4 एप्रिल: एकीकडे दिल्लीतील निजामुद्दीनच्या तबलिगी जमातचा मुद्दा गाजत असताना सोलापुरातील मुस्लिम बांधवांनी सकारात्मक पाऊल उचलल्याचे दिसत आहे. शहरातील नई जिंदगी येथील चंद्रकला नगरमध्ये असलेल्या अल फुरकान मदरस्याची जागा दोन महिन्यांकरीता आयसोलेशन वार्डसाठी देण्याची घोषणा अल फुरकान एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष मौलाना हारिस दस्तगीर यांनी केली आहे. हेही वाचा… लॉकडाऊनदरम्यान धैर्‍याने आपापले व्यवसाय सुरू ठेवणार्‍या डिलिव्हरी एजंट्सना सलाम कोरोना व्हायरस रोखण्याच्या प्रयत्नात आम्ही देशासोबत आहोत. आमच्या संस्थेद्वारे एक अरबी मदरसा चालवला जातो. चंद्रकला नगर येथील हा मदरसा सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहे. त्यामुळे या मदरस्याची जागा आम्ही आयसोलेशन वार्डसाठी उपलब्ध करून देणार आहोत. मुहम्मद पैगंबरांच्या शिकवणीनुसार हे फार मोठे आणि पुण्याचे काम आहे. त्यामुळे मदरसा सुरू होईपर्यंत सदरची जागा रुग्णांच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असून त्याबाबतचा पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचीही मौलाना दस्तगीर यांनी सांगितले आहे. **हेही वाचा..** कोरोना कशाला जिवंत राहतोय? कॅशिअर इस्त्री घेऊनच बसलाय, पाहा VIDEO तबलिगी जमातच्या सदस्यांची अंडा करी आणि बिर्याणीची मागणी दुसरीकडे, दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याच्या शक्यतेमुळे उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यात इंडोनेशियाच्या 8 नागरिकांसह 13 जणांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. तबलिगी जमातचे काही सदस्य अंडा करी आणि बिर्याणीची मागणी करत आहे. **हेही वाचा…** निशब्द करणारा क्षण! अवघ्या 7 महिन्याच्या कोरोनाग्रस्त बाळासोबत नर्सचा VIDEO बिजनौर येथील जिल्हा रुग्णालयातील क्वारंटाइन कक्षातील 8 इंडोनेशिअन आणि 5 भारतीय तबलिगी जमातच्या सदस्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणूक केली. यावेळी त्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांकडे अंडा करी आणि बिर्याणीची मागणी केली. त्यांची मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी रुग्णालयातच गोंधळ घातला. यावेळी त्यांचा गोंधळ इतका वाढला की वरिष्ठ पोलिसांना पाचारण करावे लागले. याची माहिती मिळताच डीएम रमाकांत पांडेय, एसपी संजीव त्यागी आणि सीएमओ विजय यादव यांनी रुग्णालयात पोहोचल्यानंतर या नागरिकांची समजूत काढून त्यांना शांत केले. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या