JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मानलं गुरूजी! अपंग शिक्षकाने गरीब मजुरांसाठी केलेली मदत पाहून डोळ्यात येईल पाणी!

मानलं गुरूजी! अपंग शिक्षकाने गरीब मजुरांसाठी केलेली मदत पाहून डोळ्यात येईल पाणी!

फुल नाही तर फुलांची पाकळी म्हणून मदत करत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कोडगीरकर गुरुजींच्या या कार्याचं सगळ्याच स्तरातून कौतुक होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड 06 मे: आयुष्याच्या उतारवयात कामी येतील म्हणून ठेवलेली निवृत्ती वेतनामधली लाख रुपयाची मदत बीड मधील एका अपंग शिक्षकाने गरजू 50 कुटुंबाना दिली. कठीण काळात मिळालेल्या मदतीने मजुरांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यामुळे आता माझ्या चिमुकल्यांना पोटभर घास खाऊ घालेन अशा आनंदाच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. ग्रामीण भागात कोरोना महामारीत अनेक हातावर पोट असलेल्या कुटुंबावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली. यात कोणीही उपाशीपोटी राहू नये म्हणून सामाजिक संस्था व कार्यकर्ते धान्य स्वरूपात खिचडी, जेवण देत आहेत. मात्र आरोग्यासाठी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी पैशेच त्यांच्याजवळ नाहीत. ही गरज लक्षात आल्यानंतर सेवानिवृत्त अपंग शिक्षक रमेशचंद्र कोडगिरकर यांनी लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मजुरांच्या पालावर जाऊन मदत केली. त्यांना आधाराशिवाय अपंगत्वामुळे स्वतःच्या पायावर उभेही राहत येत नाही. मात्र गरीब कुटुंबांना त्यांनी आधार दिला आहे. औषध व इतर गरजांसाठी प्रत्येकी दोन हजार रुपये असे पन्नास कुटुंबांना त्यांनी एक लाख रुपयांची मदत केली. फुल नाही तर फुलांची पाकळी म्हणून मदत करत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कोडगीरकर गुरुजींच्या या कार्याचं सगळ्याच स्तरातून कौतुक होत आहे. हेही वाचा -  स्पेशल रिपोर्टः ग्रीन झोनमध्ये असणारं नांदेड 8 दिवसात Red Zone मध्ये कसं आलं? Lockdown इफेक्ट : आता 312 किमी अंतरावरून दिसू लागला हिमालय व्हिसाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, परदेशात जाण्यासाठी पाहावी लागणार वाट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या