JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रवीना टंडन, भारती सिंग, फराह खानच्या अडचणीत वाढ, आता बीडमध्ये गुन्हा दाखल

रवीना टंडन, भारती सिंग, फराह खानच्या अडचणीत वाढ, आता बीडमध्ये गुन्हा दाखल

फराह खान, रवीना टंडन, भारती सिंग या तिघींनी जाहीर माफी मागावी, अन्यथा घराबाहेर निघू देणार नाही

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**बीड,28 डिसेंबर:**बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, कॉमेडी भारती सिंग आणि फिल्म मेकर फराह खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिघींच्या विरोधात बीड शहरातील शिवाजी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘बॅक बेंचर्स’ या कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाच्या पवित्र ग्रंथ बायबलमधील ‘हलेलूया’ या पवित्र शब्दाचा अश्लिल उच्चार करून ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या. या प्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आल्फा ओमेगो ख्रिश्चन महासंघाचे राज्य अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गुन्हा दाखल केला. फराह खान, रवीना टंडन, भारती सिंग या तिघींनी जाहीर माफी मागावी, अन्यथा घराबाहेर निघू देणार नाही, असा इशारा ख्रिश्चन समाजाने दिला आहे. तिघींना तत्काळ अटक करा, अशी मागणीही जोर धरत आहे.

संबंधित बातम्या

वादग्रस्त व्हिडीओनंतर रवीना टंडनचा माफीनामा रवीना टंडन, फराह खान आणि भारती सिंह यांच्या विरोधात नुकतीच एफआयआर दाखल करण्यात आली होती. या तिघांनी एका शोमध्ये ख्रिश्चन बांधवाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या तिघींवरही करण्यात आला होता. या तिघींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री रवीना टंडननं माफी मागत ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. रवीनानं माफी मागताना ट्विटरवर लिहिलं, कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा. मी एकही असा शब्द असा वापरलेला नाही ज्यामुळे कोणत्याही धर्माचा अपमान होईल. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमच्या तिघींचाही हेतू नव्हता. पण आमच्यामुळे जर कोणाला यामुळे त्रास झाला असेल किंवा भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सर्वांची मनापासून माफी मागते. या पोस्टसोबत तिनं या शोच्या एपिसोडची युट्यूब लिंक सुद्धा शेअर केली आहे. रवीना, फराह आणि भारती यांच्या विरोधात अमृतसरच्या अजनाला येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. ‘द ट्रिब्यून’ने दिलेल्या वृत्तानुसार एका शोमध्ये या तिघींनी एका सामुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. या तिघींनी एका कॉमेडी शोमध्ये ख्रिस्ती धर्माबद्दल काही असे शब्द बोलले आहेत जे लोकांना आवडलेले नाही. त्यांनी ज्या शब्दांचा वापर या शोमध्ये केला आहे हे ख्रिस्ती धर्माचा अपमान करणारे आहेत असंही या तक्रारीत म्हणण्यात आलं होतं. विशेष म्हणजे हा कार्यक्रम ख्रिसमसच्या दिवशीच प्रसारित करण्यात आला होता. यानंतर या तिघींच्याही प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलं होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या