अजित मांढरे (प्रतिनिधी)ठाणे, 9 जून: दुष्काळाबाबत राज्य सरकारला गांभीर्य नाही दुष्काळात सरकारनं जी पावलं उचलण गरजेचं होत ती उचलली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. दुष्काळासाठी राजकारण आणि पक्षया पलिकडे जाऊन दुष्काळाच्या प्रश्नावर गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले