JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेनेआधी काँग्रेसच पाडणार महाविकास आघाडी सरकार? पडद्यामागे जोरदार हालचाली

शिवसेनेआधी काँग्रेसच पाडणार महाविकास आघाडी सरकार? पडद्यामागे जोरदार हालचाली

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातलं महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार धोक्यात आलं आहे, त्यातच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातलं महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार धोक्यात आलं आहे, त्यातच आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस नेत्यांची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला एच.के.पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले हे सहभागी होणार आहेत. या बैठकीत काँग्रेस मोठा निर्णय घेणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. काय म्हणाले संजय राऊत? महाविकास आघाडीमधून (Mahavikas Aghadi) शिवसेना (Shivsena) बाहेर पडण्यासाठी तयार असल्याचं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे, पण त्यासाठी पहिले मुंबईत या आणि अधिकृत मागणी करा. तुमच्या मागणीचा नक्की विचार करू, अशी अटही संजय राऊत यांनी ठेवली आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल संवाद साधला, यात ते महाविकासआघाडीमधून बाहेर पडण्याबाबत काहीही बोलले नाहीत, मग 20 तासांमध्ये अचानक असं काय झालं? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना पडला आहे. आता वेळ निघून गेली दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मात्र संजय राऊत यांनी संजय राऊत यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. आता वेळ निघून गेली आहे, गाडी खूप पुढे निघून गेली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या