JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अजित पवार सुरक्षा सोडून दोन तास कुठे गेले? मंत्र्याच्या संशयामुळे खळबळ

अजित पवार सुरक्षा सोडून दोन तास कुठे गेले? मंत्र्याच्या संशयामुळे खळबळ

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) भूकंप झाल्यानंतर आता रोज नवे फासे टाकले जात आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे, कारण या सत्तानाट्यामध्ये ते दोन तास सुरक्षेशिवाय गायब होते, असा खळबळजनक दावा महाविकासआघाडीमधल्याच एका वरिष्ठ मंत्र्याने केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जून : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) भूकंप झाल्यानंतर आता रोज नवे फासे टाकले जात आहेत. शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 39 आमदार आणि काही अपक्ष यांच्यासह गुवाहाटीला गेले आहेत. राज्याच्या राजकारणात सध्या तरी एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हा सामना रंगला असला तरी महाविकासआघाडीचे नेते आणि मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भूमिकेकडे डोळ्यात तेल टाकून पाहत आहेत. अजित पवार यांच्याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे, कारण या सत्तानाट्यामध्ये ते दोन तास सुरक्षेशिवाय गायब होते, असा खळबळजनक दावा महाविकासआघाडीमधल्याच एका वरिष्ठ मंत्र्याने केला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या सर्वाधिक तक्रारी या राष्ट्रवादी काँग्रेस आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याबाबत आहेत. अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अजित पवार यांना व्हिलन ठरवलं आहे. अजितदादांना दिसला नाही भाजपचा हात अजित पवार कोरोना झाल्यामुळे सध्या क्वारंटाईन आहेत. पण त्याआधी अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटामागे भाजपचा हात दिसत नाही, असं वक्तव्य केलं, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यानंतर शरद पवारांनी या सगळ्यामागे भाजपचा हात असल्याचं सांगत अजित पवारांचा मुद्दा खोडून काढला. या वक्तव्याबाबत अजितदादांना विचारण्यात आलं असता, शरद पवारांचा शब्द अंतिम असतो, त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही, अशी प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळ बैठकीलाही दांडी अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला येत नाहीत, असं फारच कमी वेळा घडलं आहे. पण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार गैरहजर राहिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही अजितदादांनी या बैठकीला हजेरी लावली नाही. 2019 सालचं बंड महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुकांनंतर अशाचप्रकारे सत्तासंघर्ष सुरू होता, तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. शरद पवार यांनी अजितदादांचं हे बंड मोडून काढलं आणि फडणवीस-पवारांचं हे सरकार तीन दिवसांमध्येच कोसळलं. तोपर्यंत आजपर्यंत अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका का घेतली, याबाबत खुलासा केलेला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या