मुंबई, 24 ऑक्टोबर : विधानसभेच्या 288 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. अर्थात असे असले तरी भाजपला 2014 सारखे यश मिळवता आले नाही. निवडणुकीच्या प्रचारात भाजने स्वबळावर सत्ता मिळवू असे म्हटले होते. पण आता त्यांना शिवसेनेच्या मदतीशिवाय पर्याय नाही. महाआघाडीने निकालात जोरदार कमबॅक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभर केलेल्या दौऱ्यामुळे आघाडीला मोठे यश मिळाले. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात आघाडीने दमदार कामगिरी केली. वंचित आघाडी आणि MIMला प्रत्येकी 2 जागा तर मनसे फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले**.**