JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बर्ड फ्ल्यूबाबत महाराष्ट्रातील मंत्र्यांचं आवाहन, रोगाला टाळण्यासाठी दिली महत्त्वाची माहिती

बर्ड फ्ल्यूबाबत महाराष्ट्रातील मंत्र्यांचं आवाहन, रोगाला टाळण्यासाठी दिली महत्त्वाची माहिती

बर्ड फ्ल्यूबाबत पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

जाहिरात

Photo - Canva

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जानेवारी : ‘राज्यात बर्ड फ्ल्यू (Bird Flu) नियंत्रणात असून भीती नको‌, काळजी घ्या, या विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी किंवा मासे यांच्यामार्फत होत नाही. मांस, अंडी व मासे बिनधास्त खा आणि आणि तंदुरुस्त राहा. कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी व मासे यांचे सेवन थांबविल्यास प्रथिनांचीकमतरता जाणवू शकते,’ अशी माहिती पशूसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. सुनिल केदार म्हणाले की, समाजमाध्यमे व इतर प्रसिद्धी माध्यमातून प्रसारीत होणाऱ्या अफवा व आकारण भीती पसरविणाऱ्या बातम्यांपासून सावध राहा. बर्ड फ्ल्यू टाळण्यासाठी काय करावं? - पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठे सोबत संपर्क टाळा. - पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा. - शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. - एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करू नका. - जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा. - कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा. - कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा. - पूर्ण शिजवलेले मांस खा. - आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे. बर्ड फ्यू रोगाच्या काळात काय करू नये? - कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका. - अर्धवट शिजलेले मांस, चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका. - आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका. - पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका. शासनाकडून नागरिकांना विशेष आवाहन राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्या मध्ये याची माहिती दयावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोलफ्री दूरध्वनी क्रमांक 18002330418 वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती दयावी असं आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी नागरीकांना केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या