मुंबई, 05 जुलै : कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्र बोर्डाचे दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर लवकर निकाल लागेल अशी आशा विद्यार्थ्यांना आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या निकाल येण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. याशिवाय न्यूज 18 लोकमतच्या वेबसाइटवरही हा निकाल पाहता येणार आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 15 जुलैपर्यंत निकाल लागण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र महाराष्ट्र बोर्डाकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आला नाही. मात्र जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. हे वाचा- वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सोडली नोकरी, IPS नीरज जादौन यांची संघर्षगाथा कोरोनामुळे 23 मार्च रोजी होणार दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला असून अन्य विषयांच्या सरासरी गुणांच्या आधारावर या विषयाचे मार्क दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या वर्षी इयत्ता बारावीच्या 13 लाखहून अधिक तर दहावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बारावीचे निकाल 15 जुलै तर दहावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती मिळत आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे 11 वीच्या प्रेवशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 15 जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून निकाल लागल्यानंतर महविद्यालय निवड प्रक्रिया करता येणार असल्याची माहिती मिळाली आहे. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर