JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट! अनेक आमदार गैरहजर राहणार

पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट! अनेक आमदार गैरहजर राहणार

कोरोनामुळे पावसाळी अधिवेशन दोन वेळा पुढे ढकलल्यानंतर अखेरीस 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, या अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 सप्टेंबर: कोरोनामुळे पावसाळी अधिवेशन दोन वेळा पुढे ढकलल्यानंतर अखेरीस 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, या अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर पावसाळी अधिवेशनात अनेक आमदार गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. हेही वाचा..  कोरोनाचा कहर थांबेना! गणपतीत एकत्र आलेल्या एका परिवारातील 30 जण पॉझिटिव्ह पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहू शकत नसल्याचं बहुतांश आमदारांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलो यांना पत्र लिहून कळवलं आहे. काही आमदारांची वयाचं कारण देत अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितल आहे तर काही आमदारांनी विविध आजारावर उपचार घेत असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनाला 25 टक्के आमदारांची उपस्थिती घटेल सूत्रांची माहिती दिली आहे. दुसरीकडे, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. एवढंच काय तर कोरोनामुळे नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. काही नेत्यांना तर कोरोनामुळे आपला जीव गमावला लागला आहे. त्यामुळे यंदा कोरोनाचा पादुर्भाव लक्षात घेता पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं घेण्याचा निर्णय झाला आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील कोरोनामुळं वेळेआधी स्थगित करावं लागलं होतं. हेही वाचा…  कोरोनाशी झुंज अपयशी, ग्रामीण भागात विद्यार्थी घडवणारे भगत सर शिक्षकदिनी गेले काय म्हणाले नाना पटोले?/strong>

खुद्द विधानसभा अध्यक्षांनाच कोरोनाची लागण झाली आहे. नाना पटोले यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन.’ असं नाना पटोले यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या