JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मांडूळ सापाच्या आमिषाने बोलावून केला घात; कोल्हापुरातील माजी सैनिकाचा बुलडाण्यात खून

मांडूळ सापाच्या आमिषाने बोलावून केला घात; कोल्हापुरातील माजी सैनिकाचा बुलडाण्यात खून

Crime in Buldhana: दोन तोंडाचा मांडूळ साप देण्याचं आमिष दाखवून (Lure of giving mandul snake) कोल्हापुरातील दोघांना बुलडाण्यात बोलावून त्यांना बेदम मारहाण केली आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलडाणा, 07 नोव्हेंबर: दोन तोंडाचा मांडूळ साप देण्याचं आमिष दाखवून (Lure of giving mandul snake) कोल्हापुरातील दोघांना बुलडाण्यात बोलावून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधत संबंधित दोघांना दोन तोंडाचा मांडूळ साप देण्याचं आमिष दाखवलं. कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असणारे दोघे मांडूळ घेण्यासाठी बुलडाण्यात गेले असता, आरोपींना दोघांना जंगलात नेवून बेदम मारहाण केली आहे. यामध्ये कोल्हापुरातील एका माजी सैनिकाचा (Former Soldier murder) जीव गेला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, अनिल आनंदा निकम आणि  माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील अशी मारहाण झालेल्या दोघांची नावं आहेत. दोघंही कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे बुद्रुक येथील रहिवासी आहेत. संबंधित दोघांना पवार नावाच्या व्यक्तीनं दोन तोंडाचा  मांडून देण्याचं आमिष दाखवलं. त्यासाठी पैसे घेऊन बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा याठिकाणी बोलावलं. दोघंही नांदुरा याठिकाणी पोहोचल्यानंतर आरोपीनं दोघांना घेऊन जायला दुचाकी पाठवली. दोघांनाही वडोदा येथून तीन किमी आतमध्ये बाभळीच्या जंगलात नेलं. येथे आरोपींनी दोघांकडून 1 लाख 6  हजार रुपयांची रोकड काढून घेतली. हेही वाचा- पाण्यासाठी रेल्वेतून उतरली अन्..; डजनभर नराधमांनी तोडले लचके, नग्नावस्थेतच फेकलं याठिकाणी दोघांनी मांडूळ सापाची मागणी केल्यानंतर, दोघांनाही झाडाला उलटं टांगून बेदम मारहाण (looted money and beat) केली. या मारहाणी माजी सैनिक प्रल्हाद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी निकम यांच्या नातेवाईकांना फोन पेवरून काही रक्कम पाठवायला लावून एटीएममधून ही रक्कम काढून घेतली आहे. यानंतर आरोपींनी संबंधित दोघांना पूर्णा नदीच्या पुलावर आणून पुलावरून खाली फेकलं आहे. हेही वाचा- घोटभर पाण्यासाठी मालकानं घेतला जीव; बेदम मारहाणीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू जखमी अवस्थेत निकम यांनी अनेक लोकांना मदत मागितली. पण त्यांना कोणीही मदत केली नाही. शेवटी एका ॲम्ब्युलन्स चालकाने त्यांना उचलून नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केलं. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करत प्रल्हाद यांना मृत घोषित केलं. जखमी अनिल निकम यांच्या फिर्यादीवरून नांदोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या