अमरावती, 13 एप्रिल : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई युवा स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी शनिवारी अभिनेता गोविंदा अमरावतीमध्ये दाखल झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या ‘रोड-शो’मध्ये गोविंदाने जनतेला अभिवादन करत नवनीत राणा यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. यावेळी गोविंदाला बघण्यासाठी अमरावतीकरांनी गर्दी केली होती.