JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हृदयद्रावक! लॉकडाऊन आणि कर्जामुळे तरुण हवालदिल; रात्री लेकरांना शीतपेय आणून दिलं अन्...

हृदयद्रावक! लॉकडाऊन आणि कर्जामुळे तरुण हवालदिल; रात्री लेकरांना शीतपेय आणून दिलं अन्...

Suicide in Jalgaon: लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात व्यवसाय बंद पडल्यानं कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? या चिंतेतून नैराश्य आल्यानं अनेकांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

जाहिरात

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 04 जुलै: मागील दीड वर्षांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. दरम्यानच्या काळात जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) देशातील अनेक लोकांच्या नोकऱ्या (Lost jobs) गेल्या आहेत. तर व्यवसाय ठप्प झाल्यानं असंख्य जणांचे रोजगार बुडाले आहे. हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची स्थिती तर याहूनही बिकट आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद पडल्यानं कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? या चिंतेतून नैराश्य आल्यानं अनेकांनी आपल्या आयुष्याचा शेवट (Suicides) केला आहे. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना जळगावात (Jalgaon) घडली आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्यानं संसाराचा गाडा कसा हाकलायचा? या आर्थिक विवंचनेतून नैराश्य (Depression) आल्यानं संजय चिमरानी या 35 वर्षीय युवकानं आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली आहे. त्यांचा फुले मार्केटमध्ये रेडिमेड कपडे विक्रीचा एका छोटासा गाडा होता. पण लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे मिळकतही बंद झाली. अशात व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जासाठी सावकारांचा तगादाही सुरू झाला. हेही वाचा- आईनंच 5 वर्षीय चिमुकलीच्या गुप्तांगात टाकला लोखंडी रॉड; धक्कादायक घटनेनं खळबळ अशा असंख्य आर्थिक समस्यांच्या दलदलीत फसलेल्या संजय चिमरानी यांनी शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संजय यांनी आत्महत्या करण्यापूर्वी रात्री कुटुंबासोबत शेवटचं जेवण केलं. आपली दोन मुलं दक्ष आणि लक्ष यांना बाहेरून शीतपेय आणून दिलं आणि रुममध्ये निघून गेले. दरम्यान संजय यांची बायको शेजारच्या महिलांशी गप्पा मारत होती. हेही वाचा- हसत्या खेळत्या कुटुंबाला लागली नजर; एकाच साडीनं गळफास घेत दोन बहिणींची आत्महत्या शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास संजय यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची घटना उघडकीस येताच, पत्नीनं शेजारच्यांच्या मदतीनं संजय यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या