JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर

विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर

या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकत्रित ताकद विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 नोव्हेंबर : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. या जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकत्रित ताकद विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळेल. औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदार संघ तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदार संघ यासाठी ही निवडणूक होईल. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने आपला झेंडा फडकावल्यामुळे विधानपरिषदेत भाजपचं वजन वाढलं आहे. मात्र आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले असल्याने पुन्हा समीकरण बदललं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागांबाबत कुणाला संधी मिळते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. राज्यपाल नियुक्त जागांसाठी कोण आहे चर्चेत? राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागांसाठी उमेदवार यादी आज राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्याकडे दिली जाईल, अशी माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 12 जणांची यादी राज्यपालांकडे सादर करतात की काही नावे राखीव ठेवतात याकडे लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे महाधिवक्ता यांच्या सल्ल्याने तयार झालेली यादी राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केली जाईल. - राष्ट्रवादी एकनाथ खडसे राजू शेट्टी यशपाल हिंगे / अदिती नलावडे आनंद शिंदे - काँग्रेस मुजफ्फर हुसेन सचिन सावंत - शिवसेना सचिन अहिर उर्मिला मातोंडकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या