JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Raju Shetti : राजू शेट्टींनी बँकांना दिला थेट दम, शेतकऱ्यांना दिवाळी सुखाने करू द्या अन्यथा…

Raju Shetti : राजू शेट्टींनी बँकांना दिला थेट दम, शेतकऱ्यांना दिवाळी सुखाने करू द्या अन्यथा…

कर्जाच्या रुपात हे पैसे वळते करून घेतल्यास गंभीर बँकांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 21 ऑक्टोबर : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बजेटमध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेला किमान अडिच वर्षे झाल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत होते. दरम्यान अडीच वर्षांच्या संघर्षानंतर काल (दि.20) पासून शेतकऱ्यांच्या खात्यात मिळण्यास सुरू झाले आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर अनुदान जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु हे अनुदान शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाल्यावर बँका ही रक्कम कर्जाला घेण्याची शक्यता आहे. यामुळे माजी खासदार शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बँकांना सज्जड दम भरला आहे.

दरम्यान, या पैशावर सणाच्या तोंडावर बँकांनी डल्ला मारू नये, यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. शेट्टी यांनी कर्जाच्या रुपात हे पैसे वळते करून घेतल्यास गंभीर बँकांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराच त्यांनी दिला आहे. राजू शेट्टी म्हणाले की, अडीच वर्ष प्रदीर्घ संघर्ष करून शेतकऱ्यांना प्रोत्साहानपर 50 हजार मिळवून दिले आहेत. आयत्या बिळात नागोबा या म्हणीप्रमाणे बँकांनी ते कर्जाला जमा करू नयेत, शेतकऱ्यांना सुखाने दिवाळी साजरी करू द्या, अन्यथा बँकांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ते म्हणाले.

हे ही वाचा :  ‘चंद्रकांत पाटील यांचे पुन्हा मानसिक संतुलन बिघडले’ स्वाभिमानीची जोरदार टीका

संबंधित बातम्या

ते पुढे म्हणाले की, राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याशी नुकतेच माझे बोलणे झालेले आहे. प्रोत्साहनपर अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यामुळे ते परस्पर कर्ज खात्यास कपात न करण्याच्या संदर्भातील सुचना राज्यातील सर्व बँकाना दिलेले आहेत. तरीही कोणत्या बँकेने कपात केली तर स्थानिक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

राजू शेट्टींनी 50 हजार अनुदान मिळवण्यासाठी केलेल्या पाठपुरव्याची यादी

16 मार्च 2020 - 50 हजार प्रोत्साहन अनुदान त्रुटी दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सूचना 23 ऑगस्ट 2021 रोजी प्रोत्साहन अनुदान व पूरग्रस्त अनुदानासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी मोर्चा, 17 ते 20 नोव्हेंबर 2021 अनुदान व पिक विमा संदर्भात मराठवाड्यात आंदोलन, 6 सप्टेंबर 2021 जलसमाधी आंदोलन, अनुदान व पूरग्रस्त अनुदानासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक व पाठपुरावा करण्यात आला. 12 फेब्रुवारी 2022 महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे प्रोत्साहन अनुदान व इतर शेती प्रश्नासाठी पाठपुरावा.

जाहिरात

14 फेब्रुवारी 2022 जिल्हाधिकारी कोल्हापूर नियमीत कर्जफेड व शेतीला दिवसा वीज मागणीसाठी धडक मोर्चा

19 फेब्रुवारी 2022, प्रोत्साहन अनुदान व इतर मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. 24 जून 2022 रोजी प्रोत्साहन अनुदान जाचक अटी व निकष रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठपुरावा

हे ही वाचा :  राष्ट्रवादीच्या रोहित पाटलांना तगडा झटका, नगरसेवक फुटल्याने सत्ता संपुष्टात

जाहिरात

13 जुलै 2022 नियमीत कर्जफेड अनुदानातील त्रुटी व तांत्रिक बाबींसंदर्भात आक्रोश मोर्चा, 15जुलै 2022 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट व तांत्रिक बाबी व त्रुटी दुरुस्ती करुन 50 हजार अनुदानासाठी मागणी.

(नियोजीत)9 ऑगस्ट 2022 खात्यांवर जमा न झाल्यास रास्ता रोको करण्यात आला. या शिवाय बुलढाणा, सोलापूर, बारामती (भवानीनगर) पुणे, बीड, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, जळगाव, जामोद याठिकाणी राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकरी मोर्चा व सभा घेतल्या होत्या.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या