JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुराच्या पाण्यातून जाणाऱ्यांच्या अंगावर कोल्हापूरकरांनी काठीने पाडला 'पाऊस'; पाहा VIDEO

पुराच्या पाण्यातून जाणाऱ्यांच्या अंगावर कोल्हापूरकरांनी काठीने पाडला 'पाऊस'; पाहा VIDEO

कागल इथल्या निढोरी पुलावरून पुराच्या पाण्यातून काही नागरिक प्रवास करत होते. सूचना देऊनही या पाण्यातून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आणि एका पोलिसाने या नागरिकांना अद्दल घडवण्याची जबाबदारी घेतली

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर 13 ऑगस्ट : मागील जवळपास आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना आणि ओढ्यांनाही पूर आलेला आहे. अशात नागरिकांनी सतर्क राहात पुराच्या ठिकाणी जाऊ नये तसंच पुरातून प्रवास करू नये, असा सल्ला प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार देण्यात येत आहे. मात्र, अनेकजण याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसत आहेत भंडाऱ्यात अतिवृष्टीचा कहर, 2 हजार कोंबड्या गेल्या पुरात वाहून! याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच कोल्हापूरमधून समोर आली. मात्र, पुराच्या पाण्यातून जाणाऱ्या नागरिकांना पोलिसाने अशी अद्दल घडवली की ते नेहमीच लक्षात ठेवतील. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. जो मजेशीरही आहे आणि एक संदेश देऊन जाणाराही आहे. हा व्हिडिओ कागल येथील आहे.

संबंधित बातम्या

कागल इथल्या निढोरी पुलावरून पुराच्या पाण्यातून काही नागरिक प्रवास करत होते. सूचना देऊनही या पाण्यातून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आणि एका पोलिसाने या नागरिकांना अद्दल घडवण्याची जबाबदारी घेतली. व्हिडिओमध्ये दिसतं, की या पुराच्या पाण्यामधून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना या पोलिसाने चांगलेच फटके दिले. VIDEO:..अन् शेवटी ब्लँकेटची झोळी करून गरोदर महिलेला रुग्णालयात नेलं; नाशिकमधील मनाला चटका लावणारं दृश्य पुराच्या पाण्यातूनही वाहतूक सुरू असल्याने ही वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न इथले स्थानिक नागरिक करत आहेत. यावेळी पाण्यातून जाणाऱ्या वाहनधारकांना त्यांनी चांगलेच फटके दिले. व्हिडिओमध्ये या नागरिकांना काठीने चोप देताना एक व्यक्ती दिसत आहे, हा व्यक्ती पोलीस असल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि तो व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या