JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shivaji University : शिवाजी विद्यापीठातील परिक्षा विभागाच्या लेटर हेडचा गैरवापर, 4 महिन्यांपासून फसवणूक

Shivaji University : शिवाजी विद्यापीठातील परिक्षा विभागाच्या लेटर हेडचा गैरवापर, 4 महिन्यांपासून फसवणूक

शिवाजी विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 20 नोव्हेंबर : मागच्या दोन दिवसांपूर्वी शिवाजी विद्यापीठाचा 60 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे विद्यापीठाची सिनेट निवडणूकही चुरशीने पार पडली. या दरम्यान विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

शिवाजी विद्यापीठाचे बोधचिन्ह तसेच परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या लेटरहेडचा गैरवापर केल्याबद्दल राजारामपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला. परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अजितसिंह नारायणराव जाधव (वय 52) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी लक्ष घातले आहे. दरम्यान हे प्रकरण गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा :  कोल्हापूर : मुलींचे शाळेत जाणे झाले अचानक बंद, चौकशीतून हादरवणारी माहिती समोर, पालकांचा संताप

संबंधित बातम्या

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाकडून प्रशासनाकडून विविध विषयांबाबत बातम्यांद्वारे माहिती पुरवली जाते. दरम्यान संशयिताने परीक्षाच्या बाबतीत प्रसारित केलेल्या बातमीमध्ये फेरफार करून त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न संशयिताने केला आहे. बोधचिन्ह आणि परीक्षा विभागाच्या लेटरहेडचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.

हा प्रकार मागच्या तीन महिन्यांपासून म्हणजे जुलै 2022 पासून सुरू आहे. परीक्षा विभागाच्या लेटरहेडवर चुकीचा मजकूर लिहून तो प्रसारित करण्यात आला होता. यातून विद्यापीठाची बदनामी आणि फसवणूक केल्याबद्दल परीक्षा विभागाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी (दि.18) शुक्रवारी रात्री अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी पत्रकारांना माहिती दिली.

जाहिरात

जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली दखल

शिवाजी विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह एन. जाधव यांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची नुकतीच भेट घेऊन शिवाजी विद्यापीठाची बदनामी आणि परीक्षाविषयक कामकाजाविषयी समाजात चुकीचा संदेश प्रसुत करणार्‍या संशयितांचा छडा लावून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.

हे ही वाचा :  गुऱ्हाळ घरांची धुरांडी झाली सुरु… कसा बनवला जातो उत्तम प्रतीचा गूळ? पाहा Video

जाहिरात

पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी या घटनेची दखल घेत राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे व सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाला या घटनेची चौकशी करून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अशा घटनांविरुद्ध कठोर पावले उचलल्यास भविष्यात विकृत मनोवृत्तीला आळा बसेल, अशीही डॉ. अजितसिंह जाधव यांनी अपेक्षा व्यक्त केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या