JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Margashirsha Guruvar : इको फ्रेंडली कमळात करा देवीची स्थापना, पाहा Video

Margashirsha Guruvar : इको फ्रेंडली कमळात करा देवीची स्थापना, पाहा Video

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेसाठी कोल्हापुरातील महिलेनं कमळाची संकल्पना विकसित केली आहे. गुरुवारी मांडण्यात येणारी पूजा किंवा बसवण्यात येणारा लक्ष्मीव्रताचा घट हा या कमळाच्या मध्यभागी ठेवू शकतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 24 नोव्हेंबर : मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रत आणि पूजेला महिलांमध्ये विशेष महत्व आहे. अनेक घरांमधल्या महिला वर्षानुवर्ष हे व्रत करतात. या दिवशी लक्ष्मीची पूजा करुन उपवास करतात. ही पूजा साग्रसंगीत पद्धतीनं व्हावी हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.  पारंपारिक पद्धतीने ही पूजा बांधून लक्ष्मी व्रताची कथा वाचण्यात येते. त्यानंतर आरती करण्यात येते. अशाच पद्धतीने दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारच्या दिवशी हे व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीव्रताला जसे महत्व आहे, त्याचप्रमाणे यासाठी बांधल्या जाणाऱ्या पूजेला देखील विशेष महत्व आहे. या व्रताच्या दिवशी दर गुरुवारी लक्ष्मीव्रताचा घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते. तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. याच घट/पूजा बांधणीसाठी नवनवीन पर्याय सध्या उपलब्ध झाले आहेत. यावेळी पूजेसाठी ठेवण्यात येणाऱ्या कलशाला लक्ष्मीचे रूप दिले जाते. ते रूप अजून चांगल्या प्रक्रारे फुलवण्यासाठी कोल्हापुरातील एका महिलेने एक संकल्पना आणली आहे. कोल्हापूरच्या नेहा जाधव-भोसले यांनी एका कमळाची संकल्पना या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेसाठी आणली आहे. दर गुरुवारी मांडण्यात येणारी पूजा किंवा बसवण्यात येणारा लक्ष्मीव्रताचा घट हा आपण या कमळाच्या मधोमध ठेवू शकतो. जो कलश किंवा तांब्या या पूजेसाठी वापरण्यात येणार आहे. तो बरोबर कमळाच्या मध्यभागी ठेवल्यानंतर या पूजेला एक वेगळं रूप येते. Margashirsha Guruvar: झटपट आणि आकर्षक पद्धतीनं करा देवीची सजावट, Video गणेशोत्सवात आपल्या घरातील गणपतीसाठी सजावट करताना नेहा यांनी एक मोठे कमळ बनवले होते. त्यात त्यांनी गणपती बाप्पाला विराजमान केले होते. यावरूनच त्यांना ही कमळाची कल्पना सुचली होती. त्यांनी पुन्हा छोटे कमळ बनवून त्यात मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी दिसते, हे बघितले. त्यानंतर आता बाहेरच्या महिलांसाठी देखील हे कमळ नेहा बनवून देऊ लागल्या आहेत. कसे आहे कमळ? इको फ्रेंडली असणारे हे कमळ पूर्णपणे कागदापासून बनवले आहे. बाजूनी कमळाच्या पाकळ्या मध्ये कलश ठेवायला जागा आणि बाजूने पाने अशी ही कमळाची रचना आहे. कमळाच्या मध्यभागाचा व्यास हा साधारण 12 सेंटिमीटर आहे. परंतु वेगवेगळ्या आकाराचे कमळ बनवता येऊ शकतात. सध्या गुलाबी आणि लाल पाकळ्यांचे कमळ नेहा बनवतात. किती रुपये आहे किंमत? मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारच्या पूजेसाठी हे कमळ वापरता येते. त्यामुळे सर्वांना परवडेल अशा 100 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंतच्या किंमतीचे कमळ नेहा यांच्याकडे मिळतात. कमळाच्या आकारावर याचे दर ठरलेले आहेत. मार्गशीर्ष गुरुवारचं महत्त्व काय? पूजा-विधीपासून उपवासापर्यंत संपूर्ण माहिती व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या नेहा यांचा स्वत:चा स्टुडिओ देखील आहे. तरीही फक्त आवड जोपासण्यासाठी त्यांनी हा उद्योग सुरू केलाय. त्यांनी बनवलेल्या आकर्षक कमळाची बाहेरही मोठी मागणी आहे. कुठे कराल संपर्क? नेहा जाधव-भोसले, राजारामपुरी 11 वी गल्ली, कोल्हापूर मोबाईल - +91 9011087746

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या