कोल्हापूर, 15 डिसेंबर : अनेक तरुण आपली चांगली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असतात. प्रत्यक्षात हे धाडस करणं कमी जणांनाच जमतं.
कोल्हापूरमध्ये
पत्रकारिता क्षेत्रात काम करत असलेल्या एका तरुणाने या प्रकारचे धाडस करुन नव्या व्यवसायात नाव कमावले आहे. कसा केला प्रवास? संतोष वडेर असं या यशस्वी उद्योजकाचं नावं आहे. संतोष यांनी ग्रामीण भागातून आपले शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती बेताची असल्यानं ‘कमवा आणि शिका’ योजनेतून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. विद्यापीठातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलेल्या संतोष यांनी आठ वर्ष विविध माध्यमांमध्ये काम केलं. आपल्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी पत्रकारितेचं क्षेत्र अपूर्ण आहे, अशी त्यांना जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी नवा व्यवसाय करण्याचा निश्चय केला. संतोष यांनी नव्या संकल्पनेसह स्वत:चा व्यवसाय करण्याचं ठरवलं. त्यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरुप असलेले सर्व पदार्थ देण्याचं त्यांनी ठरवलं. ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी त्यांनी ‘आद्य मराठी, खाद्य संस्कृती’ या हॉटेलच्या व्यवसायाची सुरुवात केली.
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं म्हणून काय झालं… पाणीपुरी व्यवसायातून घेतली नवी भरारी, Video
हुरडा पार्टीला सुरुवात संतोष यांनी सुरूवातीला 5 गुंठ्यात हा व्यवसाय सुरू केला होता. आता त्याचा 20 गुंठ्यापर्यंत विस्तार झाला आहे. त्यांच्या या हॉटेलला आता 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. आपल्या हॉटेलमध्ये हुरडा पार्टीची संकल्पना राबवण्याचे संतोष यांच्या डोक्यात होते. याबद्दलची सर्व माहिती त्यांनी गोळा केली. सोलापूर ते नगर परिसरात मोठ्या प्रमाणात चालणारी हुरडा पार्टी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात कुणीच करत नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळेच त्यांनी हुरडा पार्टीची संकल्पना सत्यात उतरवायचे ठरवले.
‘चायवाला नरेंद्र’ बनला इन्कम टॅक्स ऑफिसर! पाहा Success Video
कृषी पर्यटनाला सुरूवात ‘सुरुवातीला आमच्याकडे हुरड्याचा ताळमेळ बसत नव्हता. इथला हुरडा हा नगर भागातून येत होता. इकडच्या लोकांना हुरडा खाण्यासाठी तिकडे जावे लागत होते, ती गरज देखील आम्ही आमच्या हॉटेल मार्फत पूर्ण करू लागलो. थोड्या थोड्या प्रमाणात येथील सगळ्या संकल्पना वाढवत गेलो. यामध्ये हुरडा, गावरान पदार्थ, जुन्या बालपणीच्या आठवणी ताजे करणारे खेळ या सगळ्यांची जोड त्यात दिली. त्यानंतर आम्ही संस्कृती कृषी पर्यटन केंद्र सुरू केले. या पर्यटन केंद्राच्या माध्यमातून डोंगर परिसरात ट्रेकिंग, बैलगाडी सवारी याचा देखील अनुभव शेतकरी, हुरडा प्रेमी, शाळेचे विद्यार्थी अशा सगळ्यांना देत गेलो,’ असे संतोष यांनी सांगितले. नोकरीतून आर्थिक आणि कौटुंबिक गरजा भागविताना स्वतःच्या गरजा पूर्ण होत नसतील, तर नोकरीला व्यवसायाची नक्की जोड द्या. स्वतः काहीतर व्यवसाय करण्याचे धाडस करा, असे आवाहन देखील संतोष यांनी तरुणांना केले आहे.
गुगल मॅपवरून साभार
अधिक माहितीसाठी पत्ता : हॉटेल संस्कृती व संस्कृती कृषी पर्यटन श्री क्षेत्र रामलिंग मंदिराजवळ, आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर - 416109. संपर्क : संतोष वडेर : +919834685177