JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur what's app status : कोल्हापूरमध्ये स्वातंत्र्य: दिनादिवशी शिक्षकाने पाकिस्तान झिंदाबाद स्टेटस ठेवल्याने खळबळ

Kolhapur what's app status : कोल्हापूरमध्ये स्वातंत्र्य: दिनादिवशी शिक्षकाने पाकिस्तान झिंदाबाद स्टेटस ठेवल्याने खळबळ

शिक्षकाने आपल्या मोबाईलवर पाकिस्तान झिंदाबाद, असा स्टेटस लावला होता. याची दखल घेत संबंधित शिक्षकावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

flaflaकोल्हापूर, 17 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले परिसरात एक खळबळ जणक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. (Kolhapur what’s app status) हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे मोठे इंटरनॅशनल शाळा आहे. त्या शाळेत जम्मूतील एक शिक्षक शिकवत आहे. त्या शिक्षकाने आपल्या मोबाईलवर पाकिस्तान झिंदाबाद, असा स्टेटस लावला होता. याची दखल घेत संबंधित शिक्षकावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  

हातकणंगले पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले असून जावेद अहमद (मूळ रा.जम्मू ) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर- सांगली मार्गावरील अतिग्रे येथील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये तो शिक्षक होता. त्याच्या या गैरप्रकारानंतर शालेय प्रशासनाने त्याची तात्काळ काढून टाकण्यात आले आहे.

हे ही वाचा :  Kolhapur Crime : कोल्हापूरात गँगवॉर, वाढदिवसाचे फलक फाडल्याचा जुन्या वादातून पेट्रोलने घरच पेटवले

संबंधित बातम्या

यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी या शिक्षकाने जम्मू - काश्मिर ब्लॅक डे असा स्टेटस ठेवल्याची महिती समोर आली होती. दरम्यान तो स्टेटस व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख व स्थानिक गुन्हे शाखा पथक पोलिसांनी तात्काळ हालचाली करत या शिक्षकाला ताब्यात घेतले. या घटनेबाबत स्थानिक पोलिसांना कोणती खबरही नव्हती.

संबधीत शिक्षकावर वरिष्ठाच्या आदेशानंतर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दाखल गुन्ह्याची माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ सूरू होती. या वादग्रस्त शिक्षकाविरुद्ध विद्यार्थी व पालकांनी प्राचार्य व संस्था चालकांकडे तक्रार दाखल केली आहे. या शिक्षकाची शालेय प्रशासनाने तात्काळ हाकालपट्टी केली आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  सेल्फी घेताना भरधाव ट्रेन आली आणि…जीवघेण्या Selfie चा थरार, पुण्याच्या तरुणाचा मृत्यू

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एका शिक्षकाने देशद्रोही कृत केल्याने परिसरामध्ये संतापाची लाट पसरली आहे. संबंधित शिक्षक हा अतिग्रे येथील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्रजी विषय शिकवत होता. तो शिक्षक अतिग्रे येथेच भाड्याने रहात होता. चौदा ऑगस्टच्या रात्री या शिक्षकाने १४ ऑगस्ट इनडिपेंड डे आणि पाकिस्तान झिंदाबादचा स्टेटस त्याच्या मोबाईलवर लावला. त्याचा हा स्टेटस स्कूलच्या विद्यार्थी आणि पालकानी वॉटस्अप गृपवर पाहिल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या