कोल्हापूर, 07 जानेवारी : यंदाच्या हंगामातील आंब्याच्या पहिल्या पेटीचा लिलाव कोल्हापूर बाजार समितीमध्ये आज (दि.07) सकाळी पार पडला. आंब्याच्या पहिल्या पेटीला 51 हजाराची बोली लागली. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते हा लिलाव झाला. खासदार महाडिक यांनीच लिलावातील पहिली आंब्याची पेटी खरेदी केली. महाडिक यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सौद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात सध्या या हापूस आंब्याचीच चर्चा सुरु आहे.
यदाच्या हंगामातील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच फळांचा राजा हापूस आंबा आज (दि.07) दाखल झाला. सालाबादप्रमांणे यंदाही कोल्हापूरकरांनी या हापूस आंब्यासाठी बोली लावली. दरम्यान पहिली आंब्याची पेटी घेण्यासाठी लावलेली बोली ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यामध्ये पाच डझनाच्या पेटीला तब्बल 51 हजार रुपयांचा दर मिळाला आहे.
हे ही वाचा : Roti Noodles : उरलेल्या पोळ्या फेकू नका, या सोप्या पद्धतीने बनवा हेल्दी-टेस्टी रोटी नूडल्स
राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सौद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात सध्या या हापूस आंब्याचीच चर्चा सुरु आहे. दरम्यान हा बहुमान खुद्द खासदार महाडिक यांनीच पटकावला आहे.
देवगड तालुक्यातील कुंभारमठ इथले शेतकरी सुहास दिंदास गोवेकर यांचा हापूस आंबा खासदार धनंजय महाडिक यांनी बोली लावत तब्बल 51 हजार रुपयांना खरेदी केला. देवगड हापूसला आजपर्यंत मिळालेला हा सर्वाधिक दर मानला जात आहे. राज्यातील हापूल आंब्यासाठी यावर्षीचा हा सर्वाधिक दर असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
हे ही वाचा : सर्वांनाच आवडणारी नागपूरची सोनपापडी कशी बनते? पाहा Video
दरम्यान, पाच डझन आंब्याला 51 हजार रुपये इतका दर मिळल्याने एका डझनाचा दर हा 10 हजार 200 रुपये दरम्यान पोहचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आंब्याची हा भाव परवडेल असे नाही. त्यामुळे सध्यातरी सर्वसामान्यांना हापूस आंब्याची चव चाखता येणार नाही.