JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Hasan Mushrif KDCC ED Investigation : कोल्हापूर जिल्हा बँकेसह मुश्रीफांच्या कार्यालयांची मध्यरात्रीपर्यंत चौकशी, ईडीला काय मिळाले?

Hasan Mushrif KDCC ED Investigation : कोल्हापूर जिल्हा बँकेसह मुश्रीफांच्या कार्यालयांची मध्यरात्रीपर्यंत चौकशी, ईडीला काय मिळाले?

कोल्हापूर जिल्हा बँकेसह ईडीकडून त्यांचा साखर कारखाना असलेल्या संताजी घोरपडे कारखान्यावरही कारवाई केली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 02 फेब्रुवारी : कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा काल ईडीने धाड टाकली. जिल्हा बँकेसह ईडीकडून त्यांचा साखर कारखाना असलेल्या संताजी घोरपडे कारखान्यावरही कारवाई केली. याचबरोबर ब्रिक्स इंडिया या कर्ज खात्याचीही चौकशी केली. काल दुपारी सुरू झालेली ही कारवाई रात्री उशीरा दोन वाजता बंद झाली. या तपासणी दरम्यान ईडीच्या हाती काही महत्वाचे कागद सापडले का? याबाबत अद्यापही कोणतीच माहिती समोर आली नाही. याचबरोबर मागच्या 30 दिवसांत मुश्रीफांच्या घरावर दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे.

हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेची मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ईडीकडून तपासणी करण्यात आली. याचबरोबर संताजी घोरपडे कारखाना आणि ब्रिक्स इंडियाच्या कर्ज खात्यांची चौकशी बँकेच्या मुख्य कार्यालयासह इतर शाखांमध्येही तपासणी करण्यात आली. यादरम्यान ही चौकशी काल मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरू होती. या कारवाईत आतापर्यंत महत्वाची कोणतीच माहिती माध्यमांच्या हाती लागलेली नाही. याबाबत मुश्रीफांकडून कोणतीही खुलासा करण्यात आला नाही.

हे ही वाचा :  हसन मुश्रीफ पुन्हा अडचणीत! ईडीचे अधिकारी 6 तासांपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत

संबंधित बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आले आहेत. मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीने छापे टाकले आहेत. बँकेच्या मुख्य कार्यालयासह सेनापती कापशी शाखेवर ही छापेमारी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या बँकेवर छापे पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागच्या सहा तासांंपासून ईडीचे अधिकारी बँकेत कागदपत्र तपासत आहेत.

जाहिरात

हसन मुश्रीफ यांच्या दालनामध्येच ईडीचे अधिकारी कागदपत्रांची छाननी करत आहेत. सेनापती कापशी ही जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक शाखा आहे, या शाखेवरही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. याआधी महिनाभरापूर्वीच ईडीने हसन मुश्रीफ यांच्या कागलमधल्या निवासस्थानी छापे टाकले होते, त्यानंतर आता मुश्रीफ अध्यक्ष असलेली बँक ईडीच्या रडारवर आहे.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 15 वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या खात्यात 50 कोटी कॅश भरले होते. ते पैसे साखर कारखान्याच्या खात्यात वळवले होते. तसेच कोलकात्यातील काही शेल कंपन्यांचा वापर करुन काळा पैसा आपल्या खात्यात वळल्याचा आरोप ईडीने केला आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  जितेंद्र आव्हाडांना अटक होणार? अजितदादांसोबतच्या NCP बैठकीची Inside Story

या प्रकरणाची मागील सहा महिन्यांपासून आम्ही चौकशी करत होतो अशी माहिती ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. काही कंपन्यांची चौकशी ईडी करत आहे. त्या कंपन्यांचे कनेक्शन हसन मुश्रीफ आणि त्यांच्या संबंधित असलेल्या साखर कारखान्यांशी जोडलं जात आहे. रजत प्रायव्हेट लिमिटेड, माऊंट कॅपिटल लिमिटेड या दोन्ही कंपन्या बंद पडल्या आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या