JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur : मातीच्या भांड्यामधे बनवलेली कोल्हापूरच्या रांगड्या चवीची मिसळ, Video

Kolhapur : मातीच्या भांड्यामधे बनवलेली कोल्हापूरच्या रांगड्या चवीची मिसळ, Video

कोल्हापूरात जुनी परंपरा टिकवण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. या हॉटेलमध्ये मातीच्या भांड्यात मिसळ तर मिळतेच त्याचबरोबर ग्राहकांसाठी बऱ्याच खास गोष्टीही आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 24 नोव्हेंबर : सध्या सगळीकडे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आणि वेगवेगळ्या चवीच्या मिसळ खायला मिळतात. अशीच एक स्पेशल मिसळ कोल्हापुरात मिळत आहे. ती म्हणजे मातीच्या भांड्यात बनवली जाणारी मिसळ. कोल्हापुरातील अनेक सरस मिसळच्या गर्दीत या मिसळीनं खवय्यांच्या मनात घर केलंय. काय आहे वैशिष्ट्य? कोल्हापुरात ग्रामीण परंपरा बऱ्याच  गोष्टींच्या माध्यमातून जपली जाते. वेगवेगळ्या पद्धतीने जुना ठेवा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच प्रकारे जुनी परंपरा कायम राहावी, लोकांना खाण्याच्या बाबतीत जुन्या परंपरा काय होत्या, त्याचा कसा फायदा होतो हे समजावं म्हणून सुनील शिंदे-ठाकूर यांनी त्यांच्या ‘मिसळ मग09 कोल्हापुरी’ या हॉटेल मध्ये एक वेगळी संकल्पना राबवली आहे. त्यांच्या या हॉटेल मध्ये मिळणारी मिसळ एका मातीच्या भांड्यात बनवली जाते. फक्त बनवतानाच नाही, तर ग्राहकांना खायला देताना देखील मातीच्या ताट आणि वाट्यांचा वापर करण्यात आला. ‘लोकांना जुन्या परंपरांचा विसर पडत आहे. म्हणूनच मला ही संकल्पना सुचली. त्यात मला स्वतःला देखील मातीच्या भांड्यात केलेले पदार्थ खूप आवडतात, ते मातीच्या भांड्यातील मिसळ मातीच्याच ताट-वाटीतून खातात, तेव्हा त्यांना देखील एक वेगळीच चव लागते,’ असे सुनील यांनी सांगितले. ब्लूमिंग ऑनियन! कांदा भजीला पर्याय असलेली कोल्हापुरी डिश तुम्ही खाल्लीय वेगळी पद्धत सुनील यांनी मिसळ बनवण्याची त्यांची वेगळी पद्धतही सांगितली. ’ घरगुती कांदा-लसूण चटणीचा घट्ट कट बनवून तो आम्ही बाजूला काढून ठेवतो. ग्राहक आल्यानंतर त्यांच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट वापरून मिसळचा रस आम्ही बनवतो. त्याचबरोबर ग्राहकांना मिसळ खाताना स्लाइस ब्रेड हवा आहे की पाव, हे देखील विचारून त्या प्रमाणे खायला देतो. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या मनाप्रमाणे मिसळ खायला मिळते,’ असे सुनील यांनी स्पष्ट केले. काय आहेत मिसळची वैशिष्टये ? 1) मातीच्या भांड्यात बनवली जाणारी मिसळ. 2) मातीच्याच भांड्यात खायला मिळते ३) मिसळ बनवताना घरगुती कांदा लसूण चटणीचा वापर 4) लाकडी घाण्याच्या तेलाचा वापर 5) कोणतेही प्रीझर्व्हेटीव्ह वापरले जात नाही 6) प्रत्येक ग्राहकाला प्रथम दिली गुळ-शेंगदाण्याची वाटी 7) सेंद्रिय गुळाचा चहा, तसंच कॉफी देखील मिळते घरीच बनवा सोलापूरची जगप्रसिद्ध कडक भाकरी, पाहा सिक्रेट रेसिपीचा Video किती आहे किंमत? मिसळ MH 09 कोल्हापुरी येथे मिळणारी साधी मिसळ फरसाण किंवा शेव चिवडा यामध्ये 55/- रुपयांना दिली जाते. तर दही मिसळ, पनीर मिसळ, चीझ मिसळ आणि पनीर-चीझ मिक्स मिसळ अशा मिसळ 60/- रुपयांपासून 95/- रुपयांपर्यंत मिळतात.

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

कोल्हापुरात कुठे खाणार? मिसळ MH09 कोल्हापुरी हे हॉटेलची सुरुवात कोल्हापुरात जानेवारी 2020 साली ताराबाई रोड येथे झाली होती. तर ऑगस्ट 2022 मध्ये याच्या 2 शाखा कोल्हापूर आणि तुळजापूर या ठिकाणी सुरू झाल्या आहेत. 1) गाळा नं. 1, शिवराम प्लाझा, कपिलतीर्थ मार्केट शेजारी, ताराबाई रोड, कोल्हापूर 2) चंद्रे फाटा, गारगोटी रोड, कोल्हापूर ३) आंबेडकर चौक, तुळजापूर अधिक माहितीसाठी संपर्क :  सुनील ठाकूर - 9326047060

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या