JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चुलीवरून थेट ताटात! ठिकपुर्लीची खास खवा बर्फी, Video पाहूनच तोंडाला सुटेल पाणी

चुलीवरून थेट ताटात! ठिकपुर्लीची खास खवा बर्फी, Video पाहूनच तोंडाला सुटेल पाणी

ठिकपुर्ली फेम खवा बर्फीची चवच न्यारी असून, जिल्ह्यासह परजिह्यांतील खवय्यांच्या जिभेवर ती कायमच रेंगाळत असते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर,12  नोव्हेंबर : कोल्हापुरच्या राधानगरी तालुक्याच्या पूर्वभागात ठिकपुर्ली गाव आहे. येथील काहींनी दुधापासून बनविलेल्या खवा बर्फीचा व्यवसाय सुरू केला होता. या बर्फीची चवच न्यारी असून, जिल्ह्यासह परजिह्यांतील खवय्यांच्या जिभेवर ती कायमच रेंगाळत असते. तीच चव आता कोल्हापूर करांना आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना शहरात चाखायला मिळत आहे. कोल्हापुरातील मंगळवार पेठेत नानाज किचन या ठिकाणी ही ठिकपुर्ली फेम खवा बर्फी बनवली जाते. आनंदा देवकर आणि त्यांचा पुतण्या संतोष हनफोडे हे दोघेजण हे नानाज किचन चालवतात. ठिकपुर्लीची ही 32 वर्षांपासूनची प्रसिद्ध खवा बर्फी तिथे जशी बनवली जाते. त्याच पद्धतीने हे दोघे ही बर्फी कोल्हापूर शहरात बनवतात.

संपूर्ण कोल्हापूर फिरलात तरी असे कबाब आणि चाट मिळणार नाही! पाहा Video

ही खवा बर्फी गोड असली तरी तिच्या बनण्यामागे प्रचंड कष्ट आहेत. हा व्यवसाय जितका गोड तितकाच उष्ण झळांनी भरलेला आहे. बर्फीसाठी प्रक्रियाविरहित शुद्ध, ताजे दूध वापरले जाते. बर्फीच्या चवीसाठी दुधात वेलदोडे व साखर योग्य प्रमाणात वापरण्यात येते. साधारणपणे दहा ते बारा लिटर म्हशीचे ताजे दूध एका घाण्यासाठी वापरतात. दूध तापविण्यासाठी चुलीच्या भट्टीचा उपयोग करतात. एकवेळ जेव्हा दूध उकळवून आटविले जाते त्या एका वळेला एक घाणा म्हणतात. दूध आटून बर्फी बनण्यास सुरुवातीला दीड ते दोन तास लागतात. दहा लिटर दुधाच्या एका घाण्यात साधारणत: 120 ते 140 बर्फीचे नग तयार होतात, अशी माहिती आनंदा देवकर यांनी दिली. सण-उत्सवांच्या काळात बर्फीला असते मागणी आपल्याकडे श्रावण महिन्यात उपवास असतात. त्यामुळे अशावेळी बर्फी सर्वत्र घेतात. शिवाय सण- उत्सवांच्या काळात या बर्फीला मोठी मागणी असते. प्रसिद्ध बर्फीची गुणवत्ता तितकीच चांगली टिकवून ठेवल्याने या बर्फीला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे, असं आनंदा देवकर यांनी सांगितले.

भाजी नसेल तर करा खमंग दुधाची आमटी, सर्वजण म्हणतील लय भारी! Video

किती रुपये असते किंमत तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी बऱ्याच जणांना आवडते. नानाज किचन मध्ये एक नग खव्याच्या बर्फीची किंमत फक्त 12 रुपये आहे. तर 360 रुपये हा किलोमागचा दर आहे.

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

पूर्ण पत्ता: नानाज किचन, जय भवानी फरसाण समोर, बजापराव माने तालीमीजवळ, मंगळवार पेठ, सी वॉर्ड, कोल्हापूर - 416012

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या