JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गोलाकार नसून चक्क 'इथं' मिळते चौकोनी इडली, पाहा काय आहे खासियत video

गोलाकार नसून चक्क 'इथं' मिळते चौकोनी इडली, पाहा काय आहे खासियत video

कोल्हापुरात इडली ही चक्क चौकोनी आकारात खवय्यांना खायला मिळत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 10 डिसेंबर : सध्या कोल्हापुरात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ खायला मिळत आहेत. पण खवय्यांसाठी नेहमीच्याच खाद्य पदर्थांमध्ये देखील काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न हॉटेल व्यवसायिक नेहमीच करत असतात. असाच एक प्रयत्न कोल्हापुरात एका हॉटेलमध्ये करण्यात आला आहे. कोल्हापूर च्या इडली स्क्वेअर या हॉटेल मध्ये खवय्यांना खाण्यासाठी चक्क चौकोनी इडली मिळत आहे. कोल्हापूरच्या शिवाजी उद्यम या ठिकाणी हे इडली स्क्वेअर हॉटेल आहे. जुलै 2022 मध्ये या हॉटेलची सुरुवात झाली आहे. या हॉटेल मध्ये साऊथ इंडियन डिशेस त्याचबरोबर पावभाजी, चहा, कॉफी, मिल्कशेक्स इत्यादी पदार्थ मिळतात. पण यात वेगळेपण आहे ते इथे मिळणाऱ्या इडली बद्दलचे. इथे मिळणारी इडली ही गोलाकार आकाराची नसून ती चक्क चौकोनी आकारात आपल्याला खायला मिळते. महेश बुधले यांना ही चौकोनी इडलीची संकल्पना सुचली होती. त्या वरूनच या हॉटेलचे नाव त्यांनी इडली स्क्वेअर ठेवले आहे.

Kheema Paratha : केरळी हॉटेलमध्ये मिळते फेमस कोल्हापूरी डिश, पाहा Recipe Video

सामान्यतः सगळीकडे मिळणाऱ्या इडलीप्रमाणेच पण अत्यंत मऊसुद अशी ही इडली आहे. खवय्यांना खाताना काहीतरी वेगळेपणा देण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी ही चौकोनी इडलीची संकल्पना आणली आहे. या इडली बरोबरच उडीद वडा, डोसा, उत्तप्पा, आंबोळी हे पदार्थ देखील इथे चौकोनी आकारात खायला मिळतात, अशी माहिती या हॉटेलचे मॅनेजर मोहनीश मिरजे यांनी दिली आहे. तर इथले पदार्थ दिसायला वेगळे आणि त्यांची चवही चांगली आहे, अशा प्रतिक्रिया येथील ग्राहकांनी दिली आहे. इडली मध्ये देखील आहेत प्रकार इथे मिळणारी चौकोनी इडली ही इथली विशेष गोष्ट आहेच पण त्याबरोबरच या हॉटेलमध्ये लहान मुलांसाठी चौकोनी मिनी इडली मिळते. ती देखील विविध रंगांमध्ये खायला मिळत असते. तर ब्लॅक अँड व्हाइट इडली, स्टिक इडली, गब्बर इडली असे देखील इडलीचे प्रकार या ठिकाणी खायला मिळतात.

Kolhapur : स्ट्रीट फूडला गावरान तडका.. स्पेशल तवा टोस्टची कोल्हापुरात चर्चा! Video

संबंधित बातम्या

कसे बनवले जातात हे चौकोनी पदार्थ ? हे पदार्थ चौकोनी आकारात बनवण्यासाठी काही प्रमाणात वेगळी पद्धत या हॉटेलमध्ये अवलंबण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये एक मोठा इडली स्टीमर आहे. यामध्येच या चौकोनी इडली बनवल्या जातात. त्या स्टीमर साठी एक स्पेशल साचा तयार करून घेण्यात आला आहे, याच्यात चौकोनी इडली बनवल्या जातात. तर उडीद वड्यासाठी देखील चौकोनी साचा खास तयार करवून घेण्यात आलेला आहे. किती रुपये आहेत किंमत ? याठिकाणी मिळणारे सर्व पदार्थ हे जरी चौकोनी आकरासाठी प्रसिद्ध असले तरी त्यांच्या किंमती या सर्व सामान्यांना परवडतील अशाच आहेत. साधारण  45 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत हे साऊथ इंडियन सर्व पदार्थ इथे उपलब्ध आहेत. हॉटेलचा पत्ता हॉटेल इडली स्क्वेअर, लक्ष्मी आईस फॅक्टरी जवळ, ई वॉर्ड, शिवाजी उद्यम नगर, कोल्हापूर संपर्क क्रमांक महेश बुधले - +919371101132

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या