JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'ज्याप्रमाणे ओबामांनी ओसामाला मारलं तसं दाऊदला घरात घुसून मारा, दाखवा मर्दपणा' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'ज्याप्रमाणे ओबामांनी ओसामाला मारलं तसं दाऊदला घरात घुसून मारा, दाखवा मर्दपणा' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी टीका करणाऱ्या भाजपलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जाहिरात

'ज्याप्रमाणे ओबामांनी ओसामाला मारलं तसं दाऊदला घरात घुसून मारा, दाखवा मर्दपणा' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विधानसभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी टीका करणाऱ्या भाजपलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी यंदाच्या अधिवेशनात मध्ये-मध्ये येऊन गेलो. कार्यालयातून कामं सुरू होती,. पण येता-जाताना… गंमत वाटेल पण गमतीचा विशष नाहीये. कारण, मी बोललो ना तेच ते आणि तेच ते…. दाऊद आणि जुते, मला वाटलं पूर्वी एक दाऊद शूज होते, तोपण घोटाळ्यात गेला म्हणा. पण ते दाऊद शूजची एजन्सी कुणी घेतली का? कारण दाऊद आणि जुते, दाऊद आणि जुते… बरं हा दाऊद आहे कुठे? एखादा निवडणुकीसाठी विषय किती काळ घेणार तुम्ही? जसा राम मंदिराचा विषय इतके वर्षे तुम्ही घेतला आता यापुढे दाऊदचा विषय घेणार आहात का? आधी रामाच्या नावाने मतं आता दाऊदच्या नावाने मतं मागणार आहात का? हे काय चाललं आहे. दाऊद आहे कुठे? बरं दाऊद हा कुठे आहे. माहिती तरी आहे का? कुणालाच माहिती नाही. मला एक आठवतं की, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, दाऊदला आम्ही फरफटत आणू. पण आता आपण त्याच्यामागे फरफटत चाललो आहोत आणि त्याचे हस्तक शोधत आहोत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

का नाही मारत दाऊदला? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मला तरी आठवत नाही, तुमच्याकडे माहिती असेल तर मला सांगा की, ओबामा यांनी ओसामाच्या नावाने मतं मागितली होती का? त्यांनी निवडणुकीत त्याचा उल्लेख केला होता का? पण ते जे टॉवर्स पाडले, देशावर हल्ला आपण बोलतो पण हल्लेखोराचं काय करतो. ओबामाने कोणाची वाट नाही पाहिली, पर्वा नाही केली. पाकिस्तान काय करेल? थेट त्यांचे जवान पाठवले आणि घरात घुसून लादेनला मारलं. याला म्हणतात मर्दपणा. का नाही मारत दाऊदला? उडवा ना, मूळ उखडून काढा. जा घुसा दाऊदच्या घरात आणि त्याला मारा (Killed Dawood Ibrahim). जसं ओबामांनी ओसामाला मारलं. याला म्हणतात मर्दपणा. याला म्हणतात हिंमत. वाचा :  कवितेतून टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला काही न करता तुम्ही आमच्यावर आरोप करत आहात. मी प्रामाणिकपणाने सांगतो की, देशद्रोहांच्या विरोधात आम्ही आहोताच आणि त्याच्याबद्दल कुठेही दुमत होण्याचं कारण नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. काश्मीरमध्ये जेव्हा तुम्ही मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेत बसला होता. पण जेव्हा अफजल गुरूला फाशी देण्याचा मुद्दा आला तेव्हा मेहबुबा मुप्था यांचं काय वक्तव्य होतं तर अफजल गुरूला फाशी देऊ नका. तेव्हा सत्तेत भाजप त्यांच्यासोबत होता. बुरहान वाणीला मारल्यावर त्याच्या घरी या मेहबुबा मुफ्ती गेल्या होत्या. या विचारांच्या असातनाही तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत बसला होता. मी कडवड हिंदुत्ववादी आहे आणि राहणारच असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या