Home /News /mumbai /

Uddhav Thackeray: कवितेतून टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला, म्हणाले...

Uddhav Thackeray: कवितेतून टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला, म्हणाले...

Uddhav Thackeray speech in Vidhan Sabha: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

    मुंबई, 25 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपकडून सत्ताधारी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi Government) घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल विधानसभेत कवितेच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अधिवेशनात जे काही झालं त्यावर मी आज मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. जे बोलणार आहे ते तळमळीने बोलणार हे. मला खोटं बोलता येत नाही. राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात केली तर मला एका गोष्टीचं खरंच दु:ख आहे, खेद आहे. राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आमच्यापेक्षा विरोधीपक्षांना जास्त माहिती आहे. तो त्यांचा अधिकारही आहे. वेळोवेळी तक्रार करण्यासाठी हक्काने राज्यपालांकडे केवळ विरोधीपक्षच नाही तर राज्यातील कुणीही नागरिक जाऊ शकतो. पण दुर्दैवाने या सर्व गोष्टी आपण जशा पाळतो, अधिकार मानतो तशा काही प्रथा, परंपरा आपण पाळल्या पाहिजेत. ठिक आहे, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. पण निदान आपल्या राज्याची एक संस्कृती आहे, प्रथा आहे, परंपरा आहे. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणाला सुरुवात करताच जो काही गोंधळ सुरू झाला तो आपल्या राज्याच्या संस्कृतीला शोभनीय नव्हता. निदान राज्यपाल महोदय काय बोलत आहेत ते तरी ऐकायला पाहिजे होतं. तेव्हा तुम्ही एक उल्लेख केला, दाऊदचा उल्लेख... तो उल्लेख तेवढ्यापूरता नव्हता तर नंतर संपूर्ण आठवडा आणि जवळपास महिनाभर आपलं अधिवेशन आहे, तो उल्लेख आपण रोजच करत आला आहात. म्हणजे देवेंद्रजी काल पाण कविता बोलून दाखवली तेच ते आणि तेच ते... ते महिनाभर केलंत तुम्ही. दाऊद एके दाऊद आणि दाऊद एक दाऊद, दाऊद दुणे कोण?... हा भाग वेगळा, पण हे तुम्ही केलंत. मला अशी एक अपेक्षा होती की, ज्यावेळी हक्काने आपण राज्य सरकारबाबत काही तक्रारी राज्यपालांकडे नोंदवत असतो तेव्हा निदान आपलं सरकार आपल्या राज्याचं सरकार काय करत आहे याच्या प्रगतीचा आढावा राज्यपाल आपल्यापर्यंत मांडत असतात. राज्यपालांचं भाषण तर ऐकलंच नाही, राज्यपाल राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत. म्हणजे इतका मोठा घोर अपमान आजपर्यंत देशभरात कुठल्या विधानसभेत क्वचितच झाला असेल असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. वाचा : विंदा करंदीकरांच्या कवितेतून देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका राज्यपालांनी आपल्या अभिभाषात काय म्हटलं तर, माझे शासन हे समाजसुधारकांच्या आदर्शांचे अनुकरण करते. आता समाजसुधारकांच्या आदर्शांचे अनुकरण करते म्हटल्यावर... त्यांचे भाषणच ऐकले नाही तर समाजसुधारक कोण? आदर्श काय आणि त्याचं अनुकरण तरी आम्ही काय करणार हा प्रश्न येतोच असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Budget, Devendra Fadnavis, Uddhav thackeray

    पुढील बातम्या