JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाचे मोठ्या शिताफीने पोलिसांनी वाचवले प्राण

आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाचे मोठ्या शिताफीने पोलिसांनी वाचवले प्राण

मध्यवर्ती बस स्थानकासमोरच्या आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळच्या विद्युत रोहित्राजवळ हा प्रकार समोर आला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 10 जानेवारी : विद्युत पुरवठा सुरू असलेल्या रोहित्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे प्राण पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचले असल्याची घटना जळगाव शहरात घडली. शुक्रवारी रात्री मध्यवर्ती बस स्थानकासमोरच्या आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळच्या विद्युत रोहित्राजवळ हा प्रकार समोर आला. विद्युत रोहित्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाने आपली ओळख नंतर पोलिसांना सांगितली, कैलास नारायण भांगे ( वय –40 , रा -यवतमाळ ) असं सदर तरुणाचं नाव आहे. अत्यंत विमनस्क अवस्थेत तो बराच वेळ रोहित्राजवळ उभा असल्याचे लक्षात आल्यावर या चौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांनी त्याला हटकले आणि त्याचा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. वीज पुरवठा सुरू असल्याने या इसमाला पोलिसांनी मागून येत रोहित्रापासून दूर ढकलून देत त्याचा रोहित्रातील हात काढला आणि मोठा अनर्थ होता होता टाळला. या तरुणाला नंतर वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले आणि जिल्हा पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. सदर इसमावर प्रतिबांधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या