जळगाव, 8 जानेवारी : राज्यात कोरोनाचं (Maharashtra Corona) प्रचंड थैमान सुरु आहे. कोरोनाबाधितांचा आकडा (Corona Patients) दररोज वाढतोय. कोरोनाचा हा प्रसार थांबावा यासाठी राज्य सरकार (Maharashtra Government) विविध उपाययोजना करतंय. विशेष म्हणजे त्यासाठी राज्य सरकार विविध निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. पण राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या कार्यक्रमातच कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचं चित्र आहे. जळगावचे (Jalgaon) पालकमंत्री आणि राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आज विविध विकासकामांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी जमलेल्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. नेमकं काय घडलं? जळगाव शहरातील वॉर्ड क्रमांक 10 मधील विकास कामांच्या लोकार्पण सोहळाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रम प्रसंगी काढण्यात आलेल्या रॅलीला शेकडो लोकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी कोरोनाबाबत पाळावयाच्या नियमांचे उल्लंघन झाले. या रॅलीत सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. सर्वसामान्य जनतेसाठी जे नियम लावण्यात आले आहेत तेच नियम राजकीय नेत्यांच्यासाठी नाही का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. ( आधी प्रेयसीला संपवलं आणि मग आईला; रक्ताळलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह ) गुलाबरावांचा निवडणूक प्रचारासारखा दौरा जळगाव शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या वॉर्ड क्रमांक 10 मध्ये त्यांनी रस्ते-गटारीसह विविध विकासकामे केली आहेत. या कामांचे आज भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह अनेक अधिकारी आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती. वॉर्ड क्रमांक दहामधील विविध विकासकामांचा शुभारंभ करतांना मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामागे मोठा जनसमुदाय फिरत होता. त्यामुळे एखाद्या निवडणूक प्रचार दौऱ्यासारखा हा दौरा वाटू लागला होता. नियमांचा पूर्णपणे फज्जा एकीकडे राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार अतिशय झपाट्याने होताना दिसत आहे. तर दुसरीकडे अशाप्रकारे कार्यक्रम घेणे आणि त्या निमित्ताने गर्दी होणे किती योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. जनतेने ज्यांचं अनुकरण करावे तेच राजकीय नेते जर अशाप्रकारे कोरोना नियमांकडे असे बेफिकीरीने बघत असतील तर सर्वसामान्य जनतेला नियम पाळा सांगण्याचा त्यांना कोणता अधिकार आहे? अशीदेखील चर्चा सध्या जनतेत सुरु आहेत. ( दुचाकी फक्त धक्का लागला, छातीवर केले चाकूने सपासप वार, नागरपुरातील घटना ) गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया “गेल्या अनेक महिन्यांपासून जळगाव शहराचा विकास खुंटला होता. रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली होती. असं असताना आता रस्त्याची कामे चांगल्याप्रकारे झाल्याने मोठ्या उत्साहाने नागरीक हे स्वयंस्फुर्तीने कार्यक्रमाला हजर झाले. तरी पुढील काळात अशी गर्दी होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ”, अशा प्रकारचं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.