छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी, वरदायिनी असल्याने छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य नेहमी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात.
उस्मानाबाद, 10 मे : भाजपचे खासदार संभाजीराजे (sambhajraje ) उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिरात (tulja bhavani mantra osmanabad) गेले असता गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारमुळे तुळजापुरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी वरदायिनी असल्याने छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य नेहमी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात. तुळजाभवानी मंदिरात आल्यानंतर ते नेहमी थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र शुक्रवारी 9 मे रोजी संध्याकाळी 9 वाजेच्या सुमारास दरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती यांना मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं. ( ‘मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरुन लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांना धमक्या’, रवी राणांचा गंभीर आरोप ) सरकारी नियम दाखवत महाराजांना मंदिरातील सिंह गाभारा जवळ जाण्यापासून रोखले. राजेंनी आपल्या घराण्याची परंपरा आपल्याला पाळू द्या, अशी नम्र विनंती करून देखील त्यांना आतमध्ये प्रवेश करू दिला गेला नाही. मंदिरातीळ कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या अन् मंदिर प्रशासनातील कर्मचारी यांनी गैरवर्तन करत खासदार संभाजीराजे यांना रोखण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर संतापलेल्या संभाजीराजे यांनी जिल्हाधिकारी यांना तात्काळ फोन लाऊन झालेल्या प्रकाराबद्दल सुनावले. ( मेहुणीसोबतच राहत होता भावोजी! दुसऱ्या पत्नीच्या भावाने चाकू भोसकून केली हत्या ) दरम्यान, हा प्रकार समजल्यानंतर तुळजापूर शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले आहे.मंदिर व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.