JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नवी मुंबईकरांनो, सोसायटीच्या गच्चीवर थर्टी फस्ट पार्टी केली तर होईल गुन्हा दाखल

नवी मुंबईकरांनो, सोसायटीच्या गच्चीवर थर्टी फस्ट पार्टी केली तर होईल गुन्हा दाखल

तुम्ही जर सोसायटीच्या प्रांगणात अथवा टेरेसवर 31 डिसेंबरच्या पार्टी करण्याचा प्लॅन करत असाल तर सावधान…

जाहिरात

तुम्ही जर सोसायटीच्या प्रांगणात अथवा टेरेसवर 31 डिसेंबरच्या पार्टी करण्याचा प्लॅन करत असाल तर सावधान...

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी मुंबई, 30 डिसेंबर : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वचजण पार्ट्या आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाची तयारी करू लागले आहेत. मात्र कोरोनाचे निर्बंध पाहता शासनाने आखलेल्या नियमांचे उल्लंघन करून 31 डिसेंबर साजरे करणाऱ्यांवर नवी मुंबई पोलीस कारवाई चा बडगा उगारणार आहेत. सोसायटीच्या टेरेसवर अथवा आवारात पार्टी केली तर कारवाई होणार आहे. तुम्ही जर सोसायटीच्या प्रांगणात अथवा टेरेसवर 31 डिसेंबरच्या पार्टी करण्याचा प्लॅन करत असाल तर सावधान, कारण सार्वजनिक ठिकाणी कोणीही पार्टी अथवा जल्लोष करणार असेल त्यावर पोलीसांची करडी नजर असून असं आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचे तसेच गुन्हेही दाखल करण्याचे सक्त आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्त बीपीन कुमार सिंह यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. ( झोपलेल्या पतीसोबत शारीरिक संबंध; दुसऱ्या दिवशीच महिलेला भोगावा लागला असा परिणाम ) फार्म हाऊस, रिसॉर्टवर पोलीसांची सतत गस्त असणार आहे. पनवेल तालुका भागात अनेक फार्म हाऊस तसंच रिसॉर्ट असल्याने मुंबई, नवी मुंबई, पनवेल सहित आसपास च्या भागातून अनेक जण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येत असतात. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी फार्म हाऊस व रिसॉर्ट असलेल्या भागात गस्त वाढवली आहे. त्याठिकाणी फार्म हाऊस मालक अथवा रिसॉर्ट मालक यांच्या व्यतिरिक्त कोणी इतर व्यक्ती आढल्यास त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे (गोव्यात सुट्ट्या घालवणाऱ्या Shriya Saran चे विदेशी पतीसोबत किसींग सीन व्हायरल ) तसंच वेळ पडल्यास गुन्हेही दाखल करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र तसंच नवी मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या पाहता राज्य शासनाने आखलेल्या नियमांचं पालन करून नवीन वर्षाच स्वागत आपापल्या घरी जल्लोषात करावं. कोणीही कोरोना नियमांचं उल्लंघन करताना दिसेल त्यावर कारवाई करण्यात येईल. सर्वांनी आपली तसेच आपल्या परिवाराची काळजी घेत नवीन वर्षाच स्वागत करावे, असे आवाहन ही पोलिसांकडून करण्यात आलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या