JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सेना-संभाजी ब्रिगेड युतीचा शिंदे सरकारवर पडणार फरक? गुलाबराव पाटील म्हणाले....

सेना-संभाजी ब्रिगेड युतीचा शिंदे सरकारवर पडणार फरक? गुलाबराव पाटील म्हणाले....

‘प्रत्येक पक्ष हा आपल्या परीने युती करण्याचा प्रयत्न करतोय मात्र शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत केलेल्या युतीमुळे

जाहिरात

अंधेरी पोटनिवडणुकीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यामध्ये शीतयुद्ध पेटले आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 27 ऑगस्ट : बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये मोठी वाताहात झाली आहे. शिवसेनेनं आता संभाजी ब्रिगेड या संघटनेसोबत युती केली आहे. मात्र, ‘प्रत्येक पक्ष हा आपल्या परीने युती करण्याचा प्रयत्न करतोय मात्र शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत ( Sambhaji Brigade ) केलेल्या युतीमुळे शिंदे सरकारला याचा काहीही फरक पडणार नाही’ अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी दिली. जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी शिवसेना आणि संभाजी बिग्रेड युतीवर भाष्य केलं. ‘विरोध करणे हे विरोधकांचे काम असून एकनाथ शिंदे सरकारने सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसह ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास यासारखे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले असून आगामी दोन वर्षात प्रलंबित कामे देखील शिंदे सरकार पूर्ण करणार असल्याचा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. विरोधकांनी कितीही टीका केली मात्र जो काम करतो त्यालाच जनता नमस्कार करते, असा चिमटा ही गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना काढला आहे. (उद्धव ठाकरेंची खमकी बाजू मांडणारे भास्कर जाधवांचा भाजप मंत्र्यांच्या गाडीतून प्रवास, नेमकं प्रकरण काय?) ‘प्रत्येक पक्ष हा आपल्या परीने युती करण्याचा प्रयत्न करतोय मात्र शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत केलेल्या युतीमुळे शिंदे सरकारला याचा काहीही फरक पडणार नाही’असंही गुलाबराव पाटील म्हणाले. (काँग्रेसच्या 7 आमदारांनी पैसे घेवून भाजपला मतदान केलं? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट) ‘प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो तसाच प्रयत्न राज ठाकरे देखील करत आहेत. मात्र यामुळे कोणाचा नफा किंवा नुकसान होईल हे सांगता येत नाही. शेवटी कोणाचे डोके जास्त निवडून येतात यालाच महत्त्व असून आम्ही डोके निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, घोडा मैदान दूर नसून त्यासाठी सर्वच नेते आणि पक्ष प्रयत्न करत असून चार सहा महिन्यात होणाऱ्या नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल अशी प्रतिक्रियाही गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या