JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ती झोप सिद्धीसाठी शेवटची ठरली; एका उंदरामुळे गेला चिपळूणमधील मुलीचा जीव

ती झोप सिद्धीसाठी शेवटची ठरली; एका उंदरामुळे गेला चिपळूणमधील मुलीचा जीव

एका उंदराचा पाठलाग करत साप घरात शिरला होता. यानंतर घरात शिरलेल्या सापाने झोपेत असलेल्या सिद्धी चव्हाण हिला 3 वेळा दंश केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे.

जाहिरात

सर्पदंशाने मुलीचा मृत्यू

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रत्नागिरी 14 ऑक्टोबर : सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र, आता समोर आलेली घटना मन हेलावणारी आहे. यात गाढ झोपेत असलेल्या मुलीला याची कल्पनाही नव्हती की पुढच्याच क्षणी तिच्यासोबत काय घडणार आहे. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील घोणसरे येथून समोर आली आहे. यवतमाळ : सोनं लूटून घरी आली अन् बिछान्यात घडला भयानक प्रकार, मुलीचा जागीच मृत्यू घटनेत सर्पदंशाने अकरावीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात एका उंदराचा पाठलाग करत साप घरात शिरला होता. यानंतर घरात शिरलेल्या सापाने झोपेत असलेल्या सिद्धी चव्हाण हिला 3 वेळा दंश केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. या घटनेनंतर सिद्धी चव्हाणला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेईपर्यंत उशीर झाला होता.. त्यामुळे सिद्धी चव्हाणचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारची झोप घेत असलेल्या या मुलीला याची कल्पनाही नव्हती की आजची ही झोप तिच्यासाठी शेवटची ठरणार आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. करवा चौथची थाली पाहून चोरालाही मोह आवरेना, पोलिसांनी पकडल्यावर जे कळलं ते अजबच यवतमाळमध्येही सर्पदंशाने मुलीचा झोपेतच मृत्यू - यवतमाळमधूनही दसऱ्याच्या दिवशी एक धक्कादायक बातमी समोर आली होती. यात सोने लूटून दमलेली एक मुलगी घरी आल्यावर झोपली. मात्र, रात्री झोपलेल्या अवस्थेत तिला सर्पदंश झाला. यामुळे या मुलीचा मृत्यू झाला आहे. दसऱ्याला सोनं लुटून घरी पोहोचलेल्या 13 वर्षीय वैष्णवी भुरवले हिचा बिछान्यातच सापाने दंश केल्याने मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील ढाकणी गावातील होती. वैष्णवी ही इयत्ता 7वी ची विद्यार्थिनी होती. यानंतर आता चिपळूणमधूनही अशीच घटना समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या