नांदगाव, 28 ऑगस्ट: नांदगावच्या वाखारी येथे 2 बालकांसह एकाच कुटुंबातील 4 जणांच्या हत्याकांड प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. हत्या करणाऱ्या आरोपींना शोधण्यास पोलिसांना अपयश आहे. यावरून आता वाखारी गावकरी संतप्त झाले असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संतप्त गावकरी रस्त्यावर उतरले आहेत. गावकऱ्यांनी धरणे आंदोलन करत निदर्शने केली. हेही वाचा… ‘…तोंडावर पडून दाखवले’,कोर्टाच्या निर्णयावर शेलारांची ठाकरे सरकारवर बोचरी टीका या आंदोलनाला शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी पाठिंबा दिला असून ते देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. वाखारी येथे 6 ऑगस्ट रोजी 2 बालकांसह एकाच कुटुंबातील 4 जणांची करण्यात हत्या आली होती. नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या वाखारी वाखारी जेऊर येथे एकाच कुटुंबातील 2 चिमुकल्यांसह चौघांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या चोरीच्या उद्देशातून करण्यात आल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. रिक्षाचालक समाधान अण्णा चव्हाण (37), भरताबाई चव्हाण ( 32), मुलगा गणेश (6), मुलगी आरोही (4) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. समाधान हे कुटुंबासह मळ्यातील घरात राहत होते. ते झोपले असताना त्यांचा झोपेतच गळा चिरण्यात आला होता. या घटनेला 22 दिवसांचा कालावधी उलटून देखील पोलिसांना आरोपी शोधण्यास यश आले नाही. याच्या निषेधार्थ शुक्रवारी वाखारीसह परिसरातील इतर गावातील संतप्त गावकरी आता रस्त्यावर उतरले आहे. गावकऱ्यांनी धरणे आंदोलन करून निदर्शने केली. या आंदोलनात शिवसेना आमदार सुहास कांदे देखील सहभागी झाले आहेत. हेही वाचा… पुढच्या 24 तासांसाठी हवामान खात्याचा इशारा, राज्यात या भागात मुसळधार पाऊस या हत्याकांडामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला होता. हत्याकांड होऊन 22 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर ही आरोपी अजून मोकट असल्याने गावकरी संतप्त झाले आहे. गावकऱ्यांनी आंदोलन करून 7 दिवसांत आरोपी पकडण्यात आले नाही तर तिव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला आहे. तर आरोपींबाबत सर्व धागे दोरे हाती लागले असून लवकरच आरोपी गजाआड केले जातील, अशी माहिती मनमाडचे डीवायएसपी समिरसिंग साळवे यांनी दिली आहे.