JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / खोटेपणा उघड झाला अन् बीएमसीतील नोकरी गेली; बुलडाण्यात तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

खोटेपणा उघड झाला अन् बीएमसीतील नोकरी गेली; बुलडाण्यात तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Suicide in Buldhana: बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलडाणा, 13 ऑक्टोबर: बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील एका झाडाला गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट (Young man commits suicide) केला आहे. आपला खोटेपणा उघड झाल्याने आलेल्या तणावातून संबंधित तरुणाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मंगेश हरिभाऊ पेरे असं आत्महत्या केलेल्या  35 वर्षीय युवकाचं नाव आहे. मृत मंगेश बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. पण याठिकाणी तो दिनेश प्रल्हाद पेरे या नावाने नोकरी करत होता. दिनेश हा मंगेशचा मावस भाऊ होता. पण 2014 साली त्याचा आकस्मिक मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगेश याने आपला मावस भाऊ दिनेश याच्या कागद पत्राचा वापर करत मुंबई महापालिकेत नोकरी मिळवली होती. तसेच 2020 पर्यंत तो नियमितपणे कामावर देखील येत होता. हेही वाचा- सोलापुरात महिलेची हत्या करून मृतदेह फेकला झुडपात; लेक गायब असल्यानं गूढ वाढलं दरम्यान, अलीकडेच मंगेशच्या पत्नीने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगेश विरोधात कौटुंबीक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलीस तपास करत, बीएमसी कार्यालयात पोहोचले. दरम्यान तपास सुरू असताना महापालिकेत काम करणारा दिनेश हाच मंगेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तरुणाचा खोटेपणा उघड झाल्यानंतर पालिकेनं त्याच्यावर निलंबनाची (Lost job in BMC) कारवाई केली. हेही वाचा- राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला सॉफ्टवेअर अभियंता; पुण्यातील खळबळजनक घटना नोकरी गेल्यामुळे मंगेश याने आपलं मूळगाव देऊळगाव घुबे याठिकाणी मोबाइल दुरुस्तीचं काम सुरू केलं. पण कौटुंबीक वादामुळे बायको माहेरी गेली आणि नोकरीही गेली. यामुळे संबंधित तरुण तणावात होता. याच तणावातून मंगेश याने देऊळगाव घुबे येथील जिल्हा परिषद शाळेतील एका झाडाला गळफास घेत, आत्महत्या केली आहे. संबंधित घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या