JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ईडी तावडीतून कसे सुटणार? भुजबळांनी अनुभवातून राऊतांना दिल्या शुभेच्छा, म्हणाले...

ईडी तावडीतून कसे सुटणार? भुजबळांनी अनुभवातून राऊतांना दिल्या शुभेच्छा, म्हणाले...

संजय राऊत यांच्यावर राजकीय सुडापोटी कारवाई करण्यात आली आहे.

जाहिरात

संजय राऊत यांच्यावर राजकीय सुडापोटी कारवाई करण्यात आली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 04 ऑगस्ट : पत्राचाळ प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीच्या कायद्यामध्ये लवकरच जामीन मिळत नाही. जर काही मार्ग मिळाला तर आमच्या शुभेच्छाच आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अनुभवानुसार दिला. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असताना छगन भुजबळ यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी संजय राऊत यांच्या अटकेवर भाष्य केलं. संजय राऊत यांच्यावर राजकीय सुडापोटी कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ईडीने अटक केली आहे. पण ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही. पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच, असंही भुजबळ म्हणाले. ( गळ्यात मंगळसूत्र घालायचं सोडून घालतात हातात; अमृता फडणवीसांचं भन्नाट लॉजिक ऐका ) एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीतच होते पण आता प्रभाग रचना का बदलली सांगता येणार नाही. जे उमेदवार असतात त्यांना वॉर्ड बदलला तर त्रास होतोच. राज्यपालांकडे आम्ही मागणी केली की पूरग्रस्तांना, शेतकऱ्याना मदत करा.. 92 नगरपालिका, 4 नगरपंचायत मध्ये ओबीसी आरक्षण लागू नाही.. बांठीया कमिशनन मध्ये ओबीसीची संख्या कमी दाखवली जातीय, अनेक त्रुटी आहेत त्यासाठी तुम्ही लक्ष घालावे, असंही भुजबळ म्हणाले. ( सिद्धार्थला पाहताच मितालीनं एअरपोर्टवर केलं असं काही; फोटो व्हायरल ) ‘5 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल का याबाबत माहीत नाही. अनेक याचिकांची गुंतागुंत सुप्रीम कोर्टात चालू आहे ती कशी सुटते ते बघू. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यावर मंत्रिमंडळाचा काय तो निर्णय होईल. पण आता दोनच मंत्री कॅबिनेटमध्ये आहे, अशी टीकाही भुजबळांनी केली. लोकसभेत पण ईडीच्या कारवायांसंदर्भात राष्ट्रवादी बोलते, सुप्रिया ताई बोलत आहे. अनेक विरोधी पक्षांनी म्हटलंय हा कायदा राक्षसी आहे. म्हणून हा कायदा युपीएच्या काँग्रेसच्या काळातच बनवला गेलाय, हा कायदा चिदंबरम यांनी बनवला, त्यामुळे भाजपला तरी काय ठेवणार ? असा सवालही भुजबळांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नाही. रात्री 2 पर्यंत जागतात, प्रवास करतात. आपल्याला पण देह आहे त्याची परिसीमा आहे. थोडी विश्रांती घ्यावा लागतेच. दोनच मंत्री आहे आणि किती दौरे करणार, असंही भुजबळ म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या